खाशित मते आठ आणि पाकिटे घेतली सोळा! आंधळा मारतोय डोळा!!

पंकज मुंदडे, जितेंद्र झाबक आशिर्वादला खिंडार पाडणार! 
लीना पाटील समर्थकांचाही जोरदार दावा!! 
खाशि निवडणूकीत आशीर्वाद पॅनलने आधीपासूनच प्रचारासह सर्व क्षेत्रात आघाडी घेतली त्यामुळे शेवटच्या टप्प्या पर्यंत एकतर्फी झालेली ह्या निवडणूकीत डॉ अविनाश जोशी व परिवर्तन पॅनल ने मात्र रंगत आणली.. त्यात पंकज मुंदडे व विद्यमान अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी जोरदार आगेकूच करीत आशीर्वादला मोठे आव्हान उभे केले. बिपीन पाटील यांच्या पत्नी लीना पाटील यांनी जितेंद्र झाबक यांचे सोबत जणू मिनी पॅनलच केल्याने त्यांचाही दावा सांगितला जात आहे. मारवाडी-गुजराथी व मराठा सह अन्य मतांची समीकरणे जुळून येतील असा लीना पाटील समर्थकांना विश्वास आहे. 
एकूणच पंकज मुंदडे व झाबक यांचे पारडे जड दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे. अभ्यासू व निष्कलंक उच्च शिक्षित चेहरा म्हनुन डॉ अविनाश जोशी यांचे बद्द्ल मोठा वर्ग काम करीत असल्याने ते चकमा देऊ शकतात. 
याचाच अर्थ आशिर्वाद पॅनल चा एकतर्फी विजय आता अशक्य असून त्यांचे किमान 3 लोक घर वापसी करतील असे खाशि मंडळ निवडणूकीतील मुरब्बी लोक सांगत आहेत. 
उद्या मतदान आहे, बाहेरगावी राहणारे मतदार खास वाहनांनी तर काही आपल्या पध्दतीने डेरे दाखल झाले तर काही रात्री पोचतील, त्यांच्या सेवेसाठी एक खास टीम उभीच आहे. 
प्रेमळ पाकिटांचे वाटप होत आले असून 'सॉलिड'साठी मोठा भाव फुटल्याने विश्वासू आहे याची खातरजमा करून शपथेवरच मोठे पाकीट देण्यासाठी खास यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. 
मतदार देखील हुशारीने सर्वांनाच खात्री देऊन जास्तीत जास्त पाकिटे पदरात पाडून घेण्यात यशस्वी होत आहेत. मते आठ आणि पाकिटे घेतली सोळा! असे किस्से चर्चेत आले आहेत, उमेदवारालाही गरज आहे म्हणून तोही भगवान भरोसे देत आहे.
दुसरीकडे आजवर एकत्र प्रचार करणाऱ्या सर्वांनी आता आपआपले मार्ग निवडल्याने मतदारांचा खिसा मात्र जड होत आहे. परिवर्तनच्या काहींनी देखील नाही नाही म्हणत आपला हात अखेर मोकळा केलाच... हे नवल घडले आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments