धुळे-अमळनेर मार्गावर टॅक्सी चालकांची 'दबंगगिरी'; प्रवाशांची आर्थिक लूट सुरूच!

प्रवाशांना दमदाटी आणि अव्वाच्या सव्वा भाडेवाढ | घरगुती गॅसचा अवैध वापर | प्रशासनाचे दुर्लक्ष!!!
सध्या लग्नसराई आणि सुट्ट्यांचा हंगाम असल्याने धुळे-अमळनेर मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीचा गैरफायदा घेत टॅक्सी चालकांनी आपली 'मनमानी' सुरू केली असून, प्रवाशांकडून शंभर रुपयांपासून ते रात्रीच्या वेळी दीडशे रुपयांपर्यंत 'जबरी वसुली' केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या प्रवाशांना थेट गाडीतून खाली उतरवण्याची किंवा गाडी न नेण्याची धमकी दिली जात आहे.
​          ​धुळे-अमळनेर हे अंतर पार करण्यासाठी नियमानुसार ठराविक भाडे असतानाही, टॅक्सी चालक प्रवाशांच्या हतबलतेचा फायदा घेत आहेत. दिवसा १०० रुपये आणि रात्री १२० ते १५० रुपये भाडे उकळले जात आहे. एका पत्रकाराने या प्रकाराला विरोध केला असता, त्यांना बाजूला बोलावून सवलत देण्याचा प्रयत्न झाला, मात्र सर्वसामान्यांकडून १०० रुपयेच वसूल करण्यात आले. जेव्हा या लुटीला विरोध होतो, तेव्हा "गाडीत गॅस नाही, गाडी जाणार नाही" असे सांगून प्रवाशांना ताटकळत ठेवले जाते. अखेर प्रवाशांनाच गरज असल्याने या चालकांपुढे ' मनधरणी' करण्याची वेळ येत आहे.
​प्रवाशांची लूट तर सुरूच आहे, पण प्रवासादरम्यान त्यांच्या जिवाशीही खेळ केला जात आहे. अनेक टॅक्सींमध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलींडरचा (LPG) वापर केला जात आहे. अत्यंत ज्वलनशील असलेल्या या गॅसमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ जास्तीचा नफा कमावण्यासाठी प्रवाशांच्या जीवाचा कोणताही विचार चालक करत नसल्याचे दिसत आहे.
 नियमित भाड्यापेक्षा दुप्पट वसुली.  प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशांना थेट खाली उतरवले जाते. घरगुती गॅसचा सर्रास वापर..  लग्नसराईमुळे पर्याय नसल्याने जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ प्रवासिंवर येते..
​"प्रशासनाने आता तरी जागे व्हावे! वाहतूक शाखा, आरटीओ (RTO) आणि तहसीलदारांनी या मार्गावर अचानक तपासणी मोहीम राबवून अशा मुजोर चालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे."
​प्रशासनाला आमचा सवाल आहे की, 
१. दिवसाढवळ्या होणारी ही लूट प्रशासनाला दिसत नाही का?
२. अवैध गॅस वापरणाऱ्या गाड्यांवर आरटीओ, तहसीलदार व पोलीस  कारवाई कधी करणार?
३. सर्वसामान्यांच्या खिशावर पडणारा हा दरोडा कधी थांबणार?
​-लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार 
७९७२८८१४४०

Post a Comment

0 Comments