अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस’च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी रघुनाथ मोरे.

कामगार क्षेत्रातून स्वागत व अभिनंदन..
सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत सातत्यपूर्ण व परिणामकारक भूमिका बजावणारे कार्यकर्ते रघुनाथ रामभाऊ मोरे यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या कार्याची दखल घेत हा निर्णय जाहीर केला.
ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष मा. गोविंदभाई परमार यांच्या आदेशाने करण्यात आली असून, राज्यभरातील संघटनात्मक बळकटीकरणाची जबाबदारी मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सफाई कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संघटनेच्या मूलभूत ध्येयधोरणांना अधिक प्रभावी गती देण्याची अपेक्षा या नियुक्तीतून व्यक्त करण्यात आली आहे. मोरे यांचा क्षेत्रातील अनुभव आणि सक्रियता लक्षात घेता, संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
           या नियुक्तीचे कामगार तसेच विविध स्तरांतून स्वागत होत असून, राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांच्या मांडणीस व त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments