आमदार अनिलदादा पाटील तुमच्या नेतृत्वाखाली जयश्री ताई अडीच वर्ष नगराध्यक्षा होत्या.. शहर विकास आघाडीचा जन्मच त्या मुळे झाला दादा... जनता विसरली नाही ते अडीच वर्ष.. ना पाण्याचे नियोजन होते... ना स्वच्छतेकडे लक्ष... ना रस्त्याना चांगले दिवस... !
मात्र ३०% हे शब्द तुमच्या त्या 'सत्ते' पासून आम्हाला ऐकायला मिळू लागले...
तेरा तेरा दिवस पाणी मिळत नहोते दादा तेंव्हा.. अगदी भर पावसाळ्यात लोकांना तुम्ही चांगलेच पाणी पाजले होते... तेंव्हा गणपतीच्या काळात.. म्हणजे भर पावसाळ्यात न प वर आलेल्या मोर्चाच्या अनेक पेपरला आलेल्या बातम्या फोटोसह कात्रण सुरक्षित आहे माझे फाईलला... प्रसिद्ध करू का? म्हणजे जे विसरले त्यांना येईल पुन्हा आठवण...
थोडक्यात माझे हाती नियोजन असते तर पाण्याचे नियोजन चांगले केले असते असे काही सांगू नका.. पाणी प्रश्नावर राजकारण करून भाषणबाजी करू नका.. जनतेने तुमच्या हाती न प ची सत्ता दिली होती आणि तुम्ही फक्त नापास झालात त्यात..
आता जे सत्तेत आहेत त्यांचे नियोजन चुकतेच आहे.. पाण्याबाबत त्यांनी दिलेला शब्द फिरवला आहे.. हे मान्यच पण तुम्ही ते नीट कराल या वर जनतेचा विश्वास नाही म्हणून तर जनतेने तुम्हाला नाकारले ना!
एकच धोरणी नेता होता.. सुरेश ललवाणी... त्याने पाजले भर उन्हात पाणी..
आमचा मित्र आज हयात नाही... पण पाणीवाला बाबा म्हणून अजरामर झाला.. असे म्हणतात की शिरीषदादा २०% अनिलदादा ३० % अहो तुम्ही काय वीस तीस करता? सुरेश ललावणी थेट ४०% घेत होते... छाती ठोकून... पण काम करत होते.. जिथे गुडघा भर पाय फसायचे त्या गल्ली बोळात प्लॉट एरियात, कॉलनीत रस्ते घातले त्या माणसाने... असे काम तुम्हाला जमले नाही, जमणार नाही... शिरीषदादाना देखील जमले नाही जमणार नाही... हे सत्य स्वीकारावे लागेल.
त्यामुळे पाणी पाणी करत बोटे दाखवत नाराजीला हवा भरू नका... लोकांनी तुम्हाला नाकारून सत्ता बदल केला आहे.. आता लोकांनाच निर्णय घेवू द्या... तुम्ही फक्त तुमच्या आमदारकिला न्याय देता येतो का ते पहा... असे लोकमत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments