याचा गर्वहरण करण्यासाठी महाबली हनुमान येणार!
अमळनेर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या गौण खनिज उपसा व निसर्गाची लुट या बद्दल सर्वत्र असंतोष आहे. या बाबत काँग्रेस नेते संदीप घोरपडे म्हणतात की, "अहंकारी रावणाला दहा तोंडे होती, पण आजच्या आधुनिक रावणाला शंभर तोंडे आहेत; आणि ही तोंडे म्हणजेच अवैध वाळू उपसा करणारे डंपर, जेसीबी आणि पोकलेन आहेत," अशा शब्दांत त्यांनी भुमिभक्षक व त्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा केला आहे.
संदीप घोरपडे यांनी आधुनिक रावणाचे रूप स्पष्ट करताना सांगितले की, ज्याला लोक मसिहा किंवा लोकप्रतिनिधी समजतात, त्याची खरी शंभर तोंडे म्हणजे जमिनीचे लचके तोडणारे डंपर, जेसीबी आणि पोकलेन आहेत. यांच्या माध्यमातून तालुक्यातील नद्या, नाले, टेकड्या आणि माळरानं पोखरली जात असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
रक्ताळलेले रस्ते आणि पाच बळी झाल्यावरही भुमिभक्षक चूप आहे.
या 'शंभर तोंडी' रावणाच्या डंपरने गेल्या सहा महिन्यांत ५ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. दररोज शेकडो लोक या मृत्यूच्या तांडवातून थोडक्यात वाचत आहेत. मात्र, एवढे गंभीर प्रकार घडूनही या अहंकारी नेत्याने मृतांच्या कुटुंबीयांप्रति साधी सहवेदनाही व्यक्त केली नाही.
याने रोजगार देण्या एवजी तरुणांच्या हाती 'अनैतिकतेचे' स्टेअरिंग दिले आहे.
तालुक्यातील सुशिक्षित तरुणांना उद्योगधंदे देऊन त्यांचे भविष्य घडवण्याऐवजी, त्यांच्या हातात या अवैध धंद्यांचे आणि डंपरचे स्टेअरिंग दिले जात आहे. 'राजकीय उभारणी'च्या नावाखाली तरुणाईला गुन्हेगारी आणि अनैतिकतेच्या गर्तेत ढकलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
कोरडी आश्वासने आणि पोकळ ओरड....
"मी पाणी देतो, लाईन लावतो," अशा गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात मात्र अपयशी ठरले आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी पाण्याचे प्रवाह अडवून वाळूचे रस्ते बनवले जातात, पण जनतेच्या घशाला कोरड पडल्यावर हेच लोक गायब असतात. केवळ इतरांच्या नावाने शंख फुंकणे हेच यांचे काम उरले आहे.
"रावणाची सोन्याची लंका ज्याप्रमाणे मातीमोल झाली, त्याचप्रमाणे या अहंकारी राजकारण्यांची घमेंडही लवकरच उतरेल. या मस्तिखोराला लवकरच 'महाबली हनुमान' भेटणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे." असेही संदीप घोरपडे यांनी म्हटले आहे.
अमळनेर तालुक्यात डंपर आणि जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेली ही लूट आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत असून, येणाऱ्या काळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
उद्या वाचा...
अनिल पाटील यांना माजी आमदार शिरीष चौधरी CM का म्हणतात?
-धनंजयबापू सोनार
(लोकहितवादी पत्रकार)
7972881440
0 Comments