अमळनेरची भूमी पोखरून या तालुक्याची धूळधाण उडवली जात आहे. स्वतःला 'भूमीपुत्र' म्हणवून घेणारेच आज या धरणीमातेचे लचके तोडत आहेत.
शेतकऱ्यांची थट्टा आणि संस्थांवर कब्जा
ज्या मातीत शेतकरी घाम गाळतो, त्या पिकाला रास्त भाव मिळवून देण्याची धमक यांच्यात नाही.
बाजार समिती....यांना बाजार समितीवर कब्जा हवाय पण शेतीमालाला भाव मिळावा असे मनात नाही.
कब्जा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी की स्वतःच्या आर्थिक साम्राज्यासाठी?
निवडणुकांचा 'घोडेबाजार' आणि लाचारीची आखणी...
शेतकी संघाच्या निवडणुका म्हणजे सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण असायला हवा. पण इथे चित्र वेगळंच आहे.
सर्वसामान्य उमेदवाराला पाठबळ देण्याऐवजी, त्यांच्याकडूनच लाखो रुपये घेऊन निवडणुकीचा 'रंगीत तालीम' कार्यक्रम..
तरुणांच्या हातात उद्योगांऐवजी 'स्टेरिंग'
तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंदे देण्याऐवजी, त्यांच्या हातात अनैतिक धंद्यांचे स्टेरिंग दिले जात आहे.
डंपरच्या अपघातात ५ बळी गेल्यावरही ज्यांच्या मुखातून सांत्वनाचे दोन शब्द फुटत नाहीत, ते लोकप्रतिनिधी जनतेचे रक्षक कसे असू शकतात?
घराणेशाही, जातीपातीचे राजकारण आणि अमळनेरचा वारसा.
इथे मराठा विरुद्ध 'मराठेतर' असा बागुलबुवा उभा करून राजकारणाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न कोण करतंय?
'महाबली हनुमान' लवकरच प्रकट होईल!"
"अमळनेरचा आधुनिक रावण कोण या प्रश्नाचे उत्तर देणारी मालिका
संदीप घोरपडे उवाच....फक्त लोकहितवादी ब्लॉग व 'पत्रकार धनंजय सोनार' या यू ट्यूब चॅनल वर....
रोज एक विषय..
रोज नवा धमाका...
ही मालिका निश्चित वाचकांना विचार करायला लावणारी आणि अमळनेरच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल...
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments