पाणीपट्टी भरताना आ.अनिलदादा पाटलांबद्दल सुटतोय 'तोंडाचा पट्टा

पुन्हा तोड मोड के जोड करत सत्ता सूत्रे बळकावण्याचा डाव!
पण  नगरसेवक पडणार नाहीत या प्रलोभनास बळी!!
"पाकीट काढलं की डोळ्यात पाणी आणि पावती पाहिली की कपाळावर आठ्या..." अमळनेर नगरपालिकेत सध्या पाणीपट्टी भरताना नागरिकांच्या तोंडून जे 'अमृताचे' शब्द निघत आहेत, त्याने राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. महाराष्ट्रात कुठेही नसलेली तब्बल १८०० रुपयांची भरभक्कम पाणीपट्टी ही विद्यमान आमदार अनिलदादा पाटील यांची तत्कालीन 'देणगी' असल्याची संतप्त भावना नागरिक आता उघडपणे व्यक्त करत आहेत. गरज नसताना शहर विकास आघाडीने लादलेला हा 'जिझिया कर' अमळनेरकरांच्या छाताडावर आजही कसा स्वार आहे, याचीच चर्चा सध्या नाक्यानाक्यांवर रंगली आहे.
अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वखालील ​नगराध्यक्षांच्या कार्यकाळातील 'ते' हाल कुणीही विसरू शकत नाही..!
​अमळनेरकरांचे ते दिवस आठवून नागरिक आजही बोटे मोडत आहेत. आमदार अनिलदादा पाटील यांच्या सुपीक डोक्यातून ही १८०० रुपयांची कर वाढीची आयडिया आली खरी, पण त्यांच्याच धर्मपत्नी जयश्रीताई पाटील नगराध्यक्ष असताना अमळनेरकरांना पाण्यासाठी मात्र वणवण भटकावे लागले होते. 
इतिहास साक्षी आहे, भर पावसाळ्यात, गणपती बाप्पाच्या डोळ्यादेखत अमळनेरमध्ये पाण्यासाठी महिलांचे हंडे मोर्चे निघाले होते. 'कर १८०० रुपये आणि पाणी मात्र गायब' अशा दुहेरी कात्रीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जनतेला अडकवले होते, अशी तीव्र टीका आता पुन्हा होऊ लागली आहे.
​शिरीषदादा चौधरींची 'जीवदायी' योजना, तर पाटलांची फक्त 'तोड-मोड'!
​दुसरीकडे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कल्पक नेतृत्वाखालील पालिकेच्या सत्तेने कलाली डोहातून पाईपलाईन करत जळोद डोहापर्यंत पाणी आणले. हीच यंत्रणा आजच्या तारखेलाही अमळनेर शहरासाठी खऱ्या अर्थाने 'जीवदायी' ठरत आहे, हे जनता विसरलेली नाही. 
मात्र, यानंतर अनिलदादा पाटलांनी 'हवा भरून' आणि 'तोड-मोड के जोड' करत पालिकेत सत्तांतर घडवून आणले व त्यावेळी बायकोला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसवण्यात ते यशस्वी झाले खरे, पण कामाच्या नावाने मात्र संपूर्ण अडीच वर्ष 'बोंबाबोंब'च राहिली. शहरात घाणीचे साम्राज्य आणि वेळे-अवेळेला येणारे पाणी, यामुळे जी 'छी-थू' झाली, ती आज १८०० चा आकडा ऐकल्यावर लोकांच्या तोंडून 'गुणगौरवा'च्या रूपाने बाहेर पडत आहे. हा गुणगौरव नेमका कोणत्या शब्दांत असतो, हे सुज्ञ अमळनेरकरांना वेगळे सांगण्याची गरज नाही!
​'नापास विद्यार्थ्याला' पुन्हा संधी मिळणार का? हा सवाल ऐरणीवर....
​नळपट्टीचां एवढा मोठा जिझिया कर लादणारे आणि शहराला पाण्यासाठी तरसवणारे नेतृत्व आता पुन्हा एकदा नगरपालिकेच्या सत्तेकडे डोळे लावून बसले आहे. 'तोड-मोड के जोड' चा तोच जुना पॅटर्न पुन्हा राबवण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. 
विद्यमान नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना 'लाडू' देणे, त्यांच्यात आपापसात गैरसमज निर्माण करणे आणि "मला नेतृत्व दिले तर मी 'यू' करेल आणि 'त्यू' करेल" अशा बाता मारल्या जात आहेत. आपण 'सिटिंग आमदार' असल्याने भरपूर निधी आणू, असे गाजर सध्या पेरले जात आहे.
​पण... अमळनेरकर आता हुशार झाले आहेत!
मिळालेल्या सुवर्णसंधीचे मातेरे करणाऱ्या आणि शहराला विकासाच्या मागे नेणाऱ्या अशा 'नापास विद्यार्थ्याला' पुन्हा सत्तेची चावी देण्याचे पाप विद्यमान सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष कदापि करणार नाहीत, असा एक मोठा सूर अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून उमटत आहे. आता या 'लाडू' राजकारणाला नगरसेवक भुलतात की जनतेच्या १८०० रुपयांच्या संतापाचा आदर करतात, हे येणारा काळच ठरवेल!
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments