​पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

अमळनेर (प्रतिनिधी): २१ जून ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने योगासने करत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

​मानवी जीवन निरोगी, सशक्त आणि प्रबल बनवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योग केवळ शरीरासाठीच नव्हे, तर आचार, विचार आणि निर्णयक्षमता सशक्त व सकारात्मक करण्यासाठी महत्त्वाचा असतो, हा संदेश समस्त विश्वात पोहोचवण्यासाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात पहाटेच्या मंगलमय वातावरणात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

​यावेळी विद्यार्थ्यांनी भुजंगासन, ताडासन, वज्रासन, शवासन, सूर्यनमस्कार आणि मयूरासन यांसारख्या विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली. योगासनांमुळे केवळ शरीर सुदृढ राहत नाही, तर अभ्यासात एकाग्रता वाढण्यास आणि चिंतन-मनन करण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

​कार्यक्रमात योगाचार्य तथा क्रीडा शिक्षक महेश माळी यांनी योगासनांची माहिती व मानवी जीवनाला मिळणारी नवसंजीवनी यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, पतंजली योगपीठ हरिद्वारचे योगाचार्य स्वामी रामदेव बाबा यांचे परमशिष्य श्री गजानन माळी यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व आणि त्याचे दैनंदिन जीवनातील फायदे समजावून सांगितले.

​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, तसेच रोहन मुंदडा, व्ही.पी. बडावे, प्रशांत वंजारी, अशोक महाजन, सविता सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

-धनंजयबापू सोनार 

लोकहितवादी पत्रकार 

7972881440

Post a Comment

0 Comments