अमळनेरात नागरिकांच्या जीवाशी भयंकर खेळ! रद्दीत मिळतायत 'विषारी' पोहे आणि भजी!

"तुकाराम मुंढे आले तरी त्यांनाही रद्दीतच पोहे देऊ!"
माजोरड्या विक्रेत्यांची थेट प्रशासनाला खुली धमकी!
'आमचं कोण काय वाकडं करणार?' या मग्रुरीच्या नशेत अमळनेर शहरातील पोहे, भजी विक्रेते व अनेक खाद्य पदार्थ विक्रेते थेट नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा संतापजनक प्रकार चव्हाट्यावर आला आहे!
कायद्याला थेट केराची टोपली दाखवत, शहरातील छोटे बडे हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावरील विक्रेते राजरोसपणे 'वर्तमानपत्राच्या रद्दीत' खाद्यपदार्थ विकून अमळनेरकरांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत.
वर्तमानपत्राच्या कागदावर वापरण्यात येणारी शाई आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. त्यामुळे यात कोणताही खाद्यपदार्थ बांधून देऊ नये, असे कडक कायदेशीर निर्देश आहेत.
मात्र, अमळनेरमध्ये या नियमांच्या अक्षरशः चिंध्या उडवल्या जात आहेत. प्रशासनाचा कोणताही धाक या व्यापाऱ्यांना राहिलेला नाही.
"येऊ दे तुकाराम मुंढे, त्यांनाही रद्दीतलाच पोहा देऊन गप्प बसवू!"
हे धक्कादायक वाक्य आहे अमळनेरमधील निर्लज्ज आणि कोडग्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे!
ग्राहकांसमोर उभे राहून अशी उर्मट आणि मुजोरीची भाषा वापरून हे विक्रेते थेट प्रशासनाला आणि कायद्यालाच खुलं आव्हान देत आहेत.
रद्दीतील कागद म्हणजे आजारांचे माहेरघर!
या मुजोर विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या थेट पोटात विष कालवले जात आहे: वर्तमानपत्राच्या शाईत लेड (Lead) आणि इतर विषारी रसायने असतात जे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देतात. रद्दीचा कागद अनेक हातांमधून आणि अस्वच्छ ठिकाणांवरून आलेला असतो, हजारो जीवघेणे बॅक्टेरिया गरम पोहे, भजी वा खाद्य पदार्थ दिल्याने शाई अन्नात मिसळते व अन्न अक्षरशः विषासमान बनते या संतापजनक आणि जीवावर बेतणाऱ्या प्रकाराविरोधात 'आम्ही अमळनेरकर' या जागरूक नागरिक गटाने अखेर रणशिंग फुंकले असून, अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) धडक तक्रार दाखल केली आहे.
आता खरी परीक्षा प्रशासनाची आहे!
FDA चे अधिकारी या माजोरड्या आणि नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलचालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारणार का?
याकडे संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष लागून आहे. प्रशासनाने जर वेळीच डोळे उघडले नाहीत, तर ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या मुजोर विक्रेत्यांना जनताच धडा शिकवेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे!
– धनंजयबापू सोनार 
लोकहितवादी पत्रकार 
7972881440

Post a Comment

0 Comments