अमळनेर येथील ८० फुटी रस्त्यावर झालेल्या अपघातात मारवड पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, या रस्ता अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार शहा असल्याची माहिती पुढे येत आहे. तो किंवा जो ठेकेदार असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांच्या जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरलेल्या शाह किंवा संबंधित ठेकेदारावर 'सदोष मनुष्यवधा'चा (कलम ३०४) गुन्हा दाखल करावा आणि त्याला तातडीने 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागत आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
- लोकहितवादी पत्रकार,
धनंजय बापू सोनार
7972881440
0 Comments