डॉ वासुदेव देसले यांनी कावड यात्रेत शुद्ध पाणी व राजगिरा लाडू वाटत नोंदवला सक्रिय सहभाग.

त्र्यंबकेश्वर येथे कावड यात्रेत निवृत्त उपपोलीस अधीक्षक डॉ. वासुदेव देसले यांचा सक्रिय सहभाग; भाविकांना शुद्ध पाणी व राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप

त्र्यंबकेश्वर / नाशिक पवित्र श्रावण महिन्यानिमित्त त्र्यंबकेश्वर ते नाशिक परिसरात धार्मिक उत्साहात पार पडणाऱ्या कावड यात्रेत निवृत्त पोलीस उपअधिक्षक (DySP) डॉ. वासुदेव देसले यांनी प्रत्यक्ष कावड वाहून आणि भाविकांची सेवा करून आपला सक्रिय सहभाग नोंदवला. यात्रेदरम्यान त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून हजारो शिवभक्त व कावडधारकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप केला.

कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावून नुकतेच निवृत्त झालेले डॉ. वासुदेव देसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुषमा देसले हे नेहमीच सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात. अमळनेरसह नाशिक विभागात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांत या दांपत्याचा मोठा पुढाकार असतो.

​या धार्मिक सोहळ्यादरम्यान डॉ. देसले यांनी खांद्यावर पवित्र कावड वाहून प्रत्यक्ष पदयात्रेत सहभाग घेतला. तसेच रस्त्याने जाणाऱ्या सर्व लहान-मोठ्या भाविकांना, कावडधारकांना स्वयंसेवकांच्या सोबतीने पिण्याचे पाणी आणि राजगिरा लाडूंचे वाटप करून सेवेचा वस्तुपाठ घालून दिला.

​"पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही समाजाशी जोडलेले राहणे आणि ईश्वरीय कार्यात सेवाभाव जपणे हाच खरा आनंद आहे," अशी भावना याप्रसंगी डॉ. वासुदेव देसले यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमाचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

 -लोकहितवादी पत्रकार 

धनंजय बापू सोनार 

7972881440

Post a Comment

0 Comments