कर्तव्याप्रती दक्ष राहण्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचे : प्रा. अशोक पवार

अमळनेरात मध्यरात्री १२:०१ वाजता राष्ट्र सेवादलातर्फे स्वातंत्र्यदिनाचा पहिला क्षण साजरा; ४५ वर्षांची गौरवशाली परंपरा कायम
"आपल्या कर्तव्याप्रती सदैव सजग राहण्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. संविधानावरील निष्ठा दृढ करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत जात-धर्माच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच खरी देशसेवा आहे," असे विचार प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवादल, अमळनेर शाखेच्या वतीने सुभाष चौकात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक १२ वाजून १ मिनिटाने ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिनाचा पहिला क्षण उत्साहात साजरा करण्यात आला. गेली ४५ वर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या या उपक्रमात सेवादलाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कल्पना गौतम मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
​ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहीद स्तंभ, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पूज्य साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
​सांस्कृतिक परंपरेच्या पुनरुज्जीवनाची अपेक्षा
पूर्वी प्रा. अशोक पवार, धनंजय सोनार, जगदीश तावडे, गौतम मोरे, रवींद्र पांडे, भारती गाला, डॉ. मिलिंद वैद्य, प्रदीप देशमुख, चेतन शाह, सुधाकर देशमुख, दिलीप चौधरी, अनिल पाटील, श्रीराम चौधरी, बाबुलाल चौधरी, अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन खंडारे, दिनेश वाल्हे, अमोल येवले, ज्ञानेश्वर महाजन, तुषार पाटील, बापू पाटील, रावसाहेब पाटील, शिवाजी महाजन, सिकंदर शेख यांच्यासह शेकडो युवक १४ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत देशभक्तीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून नागरिकांना खिळवून ठेवत असत. ही गौरवशाली परंपरा पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उदय खैरनार यांनी मानले.
​या ऐतिहासिक सोहळ्यास डॉ. मिलिंद वैद्य, भारती गाला, दिलीप सोनवणे, अमोल येवले, प्रशांत बडगुजर, दीपक चव्हाण, तुषार संदानशिव, भालचंद्र सनेर, अशोक पाटील, संजय पाटील, धर्मेश निकुंभ, सुधाकर देशमुख, शिवाजी महाजन, आरिफ भाया, विजयेंद्र शिरसाळे, हरीश देशमुख, प्रशांत चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजय बापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments