अमळनेर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
अमळनेर येथील ऐतिहासिक श्री राम मंदिरात ७ सप्टेंबर रोजी लोकदेवता, वीर शिरोमणी जती जाहर दिवाण गोगा देव यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आणि नवनाथांच्या विचारांची प्रेरणा देणारे लोकदेवता म्हणून गोगा देव यांची ओळख संपूर्ण देशभरात आहे.
बागड नरेश छत्री चौहान कालखंडात (सन १००७ च्या काळात) सर्वोपरी जती योगी गुरू गोरखनाथ यांच्या असीम कृपेने ददरेवा (ददखेडे) येथील अधिपती महाराज उमरसिंह चौहान यांच्या वंशात, राजा जेवरसिंह चौहान व धर्मपरायण महाराणी बाछल (छत्राणी) यांच्या पोटी गोगा देवांचा जन्म झाला होता.
हा पंचवीरांचा जन्मोत्सव असून यास धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.भाद्रपद कृष्ण पक्षातील अष्टमीच्या मध्यरात्री १२ नंतर म्हणजेच नवमीला हा जन्मोत्सव साजरा केला जातो. या परंपरेत गोगा देवांसह पाच वीरांची संस्कृती मानली जाते: नृसिंह, भज्जू सिंह कोतवाल, रतनवीर सिंह चावरिया, अश्व, वीर शिरोमणी: गोगा देव जाहर वीर चौहान यांचे स्मरण व वंदन केले जाते. नंतर नृसिंह विदाई' व धार्मिक विधी संपन्न होतो. जन्मोत्सवानंतर वाल्मिकी समाजातील भाविक नदीकाठी जाऊन आपले व्रत-उपवास सोडतात. नदीची विधिवत पूजा करून राखीचे पाण्यात विसर्जन केले जाते, ज्याला 'नृसिंह विदाई' असे म्हटले जाते. सनातन वैष्णव परंपरेनुसार हा विधी भक्तिभावाने संपन्न होतो.या जन्मोत्सवानिमित्त अमळनेर परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कवी, शायर तथा गोगाभक्त दीपक हटवाल यांनी केले आहे.
-धनंजय बापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
0 Comments