अमळनेरच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात सध्या आमदार अनिल पाटील यांच्या नव्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
अमळनेरच्या इतिहासात पहिल्यांदाच आ. अनिल पाटील यांनी बिपिन बापू यांच्या पत्नी आदरणीय लीना पाटील यांचे खा शी मंडळ निवडणुकीत त्यांचे उमेदवारीला पाठिंबा दिला. विजयी झाल्यावर अभिनंदन देखील केले. लीनामॅडम यांचे अभिनंदन योग्यच होते.
तसेच, नुकतीच अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झालेले अभिषेक पाटील आणि वसुंधरा लांडगे यांचे निवडी बद्दल आमदारांनी थेट आपल्या फेसबुक पेजवरून, फलक लावून आणि समाजमाध्यमांद्वारे जाहीर अभिनंदन केले.
शेतकी संघात 'मोठे लाडू' देऊन भैय्यांना खेळवत ठेवले, त्याचीच ही भरपाई असावी, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.
अभिषेक पाटील आणि वसुंधरा मॅडम यांचे अभिनंदन केलेच पाहिजे, यावर कोणाचेही दुमत नाही. मात्र, या निमित्ताने जनतेच्या मनात एक रास्त सवाल उपस्थित होत आहे की, यापूर्वी आमदार अनिल पाटील यांनी अशा प्रकारे किती जणांचे जाहीर अभिनंदन केले आहे?
खाशी मंडळ, शेतकी संघ, नगरपरिषदेतील त्यांच्याच गटाचे नगरसेवक, त्यांच्याच आघाडीचे नगराध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, सानेगुरुजी वाचनालय, विद्रोही साहित्य संमेलन अध्यक्ष, मसाप अशा अनेक ठिकाणी आमदारांना अशी तत्परता दाखवता आली नाही.
अमळनेरचे युवा वक्ते सारांश सोनार यांनी दिल्लीत संसद भवनात भाषण दिले, निर्भय सोनार राष्ट्रीय स्पर्धा विजेते ठरले, तसेच अनेक विविध जाती-धर्मातील युवा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले. अमळनेर शहर व तालु्यातील पत्रकारांचे जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व खुलले अशा अनेक पत्रकार पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक करणे आमदारांना जमले नाही. या कर्तृत्ववान लोकांच्या वेळी आमदार अनिल पाटील यांचे फेसबुक खाते फ्रीज झाले होते का? की प्रसिद्धी यंत्रणेसाठी त्यांच्याकडे साधे फूल घ्यायलाही पैसे नव्हते?
अगदीच अँड सारांश सोनार व अँड पूजा सुरसूरे यांनी देहदानाचे संकलप करीत रक्तदान करून साध्या पद्धतीने आदर्श आंतरजातीय विवाह केला. तालुक्याचे पालक व आमदार म्हणून या आदर्श विवाहा बद्दल अभिनंदन करावे अशी घटना वाटली नाही.
प्रत्यक्ष भेटल्यावर किंवा फोनवरून एखाद्या पोपटासारखे गोड बोलून ('बोलबच्चन' आमदार असे जनता जाहीर म्हणते...) त्यांनी केवळ वेळ मारून नेली, अशी बोचरी टीका आता जनता करत आहे.
अर्बन बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना आमदारांची ही तत्परता नक्कीच आवडली, पण इतर वेळी ते पेंगुळलेले होते का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. 'भूमिपुत्र' म्हणून सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, ही जनतेची रास्त अपेक्षा असते. आता उशिरा का होईना आमदार सुधारले असून 'यापुढे सर्वांचे कौतुक करू' असे धोरण घेऊन ते मैदानात आले आहेत का?
कारण आत्तापर्यंत साधे गुलाब पुष्प घेऊन ते कुणाला भेटायला गेल्याची आठवण कुणालाच नाही. झालेल्या चुकांची परिणीती म्हणूनच त्यांनी अर्बन बँकेच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले असावे. यामुळे त्यांचा 'टीआरपी' वाढला असला तरी, अनेक लोक फोन आणि मेसेज करून आमदारांचा हा दुजाभाव व पक्षपात उघडपणे दाखवून देत आहेत.
शेतकी संघाच्या निवडणुकीत विनोद पाटील यांचा कुणी कसा 'गेम' केला गेला, हे सर्वांना ज्ञात आहेच. अशात अनेक निष्ठावंतांचे अभिनंदन करणे का टाळले? या पक्षपाती धोरणाबाबत भूमिपुत्र आमदार अनिल पाटील काही खुलासा करणार का? याकडे आता संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष लागून आहे.
-----------
उद्याचा धमाका:
'अमळनेर बाजार समितीत एका वर्षात राजीनामा घेणार... दरवर्षी नवीन चेहऱ्याला संधी मिळणार', असे आ. अनिल पाटील यांचे शब्द हवेतच कसे विरले? सविस्तर वृत्त उद्या...
----------
लोकहितवादी लिहिणार...
लोकहितवादी बोलणार...
- धनंजय बापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
(७९७२८८१४४०)
0 Comments