अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत, कोअर प्रोजेक्ट कंपनी (अमरावती) द्वारे नव्याने लावण्यात आलेल्या अन्यायकारक आणि अव्वाच्या सव्वा घरपट्टी विरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. या चुकीच्या कर आकारणीविरोधात आवाज उठवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वाढीव व अन्यायकारक घरपट्टी विरोधात लढा देण्याबाबत चर्चा व मार्गदर्शन व्हावे या साठी दिनांक: रविवार, २० सप्टेंबर २०२६ दुपारी ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज गार्डन (पोस्ट ऑफिसच्या बाजूस), अमळनेर येथे हजर राहावे.. या बैठकीस सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि अमळनेरच्या तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.
चुकीच्या पद्धतीने लादलेल्या या कराविरोधात एकत्र येऊन योग्य तो लढा उभारणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments