घरी कुणीतरी वाट पाहत आहे!

अति आत्मविश्वास दाखवून स्वतः सह इतरांना मारू नका!

सर्व वाहन चालकांना विशेषतः दुचाकी चालकांना विनंती की

पाऊस, त्या कारणे शेतातून आलेले ट्रॅक्टर, बैलगाडी वा अन्य कारणे मुख्य रस्त्यावर चिखल होतो, वाहन स्लिप होते,
अन्य ऋतूत देखील रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनातून वाळू पडलेली असते,
एखाद्या वाहनाचे ऑइल पडलेले असते,
●सुसाट वेगात जाऊ नका,
●वाहन जपून चालवा,
●रात्री प्रवास करताना अनेकदा बैलगाडी वा रेडियम नसलेले वाहन रस्त्यात असते, आपण लवकर पोचू म्हणत वेगाने जातो अन घरा ऐवजी दवाखाना वा अनंताच्या प्रवासाला निघतो,
आपले सोबत असलेली व्यक्ती जिचा काहीच अपराध नाही तिला आपण फुकट मरणाच्या दारात नेतो. 

तुमच्या सोबत येणे हा त्या बिचाऱ्या व्यक्तीचा अपराध नक्कीच आहे!
कृपया काळजी घ्या व आपल्या मुळे कुणाचा अपघात होणार नाही याची देखील काळजी घेतलीच पाहिजे.
असेही स्टाईलधारी धूम स्टाईल वाहन चालवतात त्यांना सार्वजनिक रित्या पकडून, त्यांचे वाहन क्रमांक घेऊन त्यांच्या पालकांना सांगितले किंवा पोलिसात तरी दिले पाहिजे
घरी कुणी वाट पाहत आहे!
जाणीव ठेवा!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments