लकी ड्रॉ/ स्क्रॅच कुपन द्वारा सोडत काढणे अपराधच

व्यवसाय वृद्धी साठी अमळनेर सह जिल्ह्यात सर्वत्र लॉटरीचा सुळसुळाट! 
धनंजय सोनार यांनी प्रशासनास लेखी तक्रार देऊन केली कारवाईची मागणी!
व्यवसायाच्या स्पर्धेत अनेकांनी प्रलोभने दाखविणे सुरू केले असून शासन मान्यता नसताना लकी ड्रॉ/ स्क्रॅच कुपन योजना सुरू केली आहे. 
नियमानुसार धर्मदाय आयुक्त तथा प्रशासनाची पूर्व परवानगी घेतली पाहिजे. 
ज्या कारणे सोडत/लकी ड्रा/ वा स्क्रॅच कुपन योजना राबवित आहेत त्या साठी उचित कारण हवे! 
अशी परवानगी घेतल्या नंतरही सोडत काढणे साठी तटस्थ पंच व या सोडत योजनेवर शासनाची देखरेख हवी.
परंतु अमळनेर येथील खाद्य पदार्थ विक्रेत्या सह अनेकांनी अशा बेकायदा सोडत/लकी ड्रा योजनांचे पत्रक काढून जाहिरातबाजी चालविली असून धर्मदाय आयुक्त, प्रांताधिकारी, पोलीस व संबंधित प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष होत आहे. 
प्रलोभन दाखवुन व्यवसाय करणे हा देखील अपराध आहे. तसेच या लकी ड्रा योजने मूळे वाद विवाद, गर्दी जमणे, आपसात भांडणे होणे, रस्ता अडविणे, असे अनेक अपराध घडू शकतात. 
जिल्ह्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व धर्मदाय आयुक्त यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी विनंती धनंजय सोनार यांनी केली आहे.

-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments