अनधिकृत जिना काढून बेकायदा मजला बांधला व फुटपाथही बळकावला!!

अमळनेर मुख्याधिकारी लक्ष देतील का?
राजेश प्रभाकर पवार यांची न.प. कडे लेखी तक्रार!
थेट नगरपरीषदे समोरच 'अधिकारींचे नाकावर टिच्चून' अमळनेर अर्बन बँके समोरील राजस्थान स्वीट मार्ट या व्यावसायिकाने क्लासिक स्टुडिओ सह लगतच्या सर्व व्यावसायिक व ग्राहकांच्या हक्काचा फुटपाथ वैयक्तिक स्वार्थासाठी बळकावला असून भर रस्त्यात धंदा मांडला आहे.
तसेच कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर जिना काढुन वर माळा बांधला आहे.
या पूर्वी देखील बेकायदा धुराडे ( चिमणी) काढले होते.. ते लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांचे आंदोलना मुळे तोडावा लागले होते.
आता पुन्हा सार्वजनीक वापराचा रस्ता बळकावून राजस्थान स्वीट मार्ट चा मालक/संचालक कायदेभंग करीत असल्याची पवार यांची तक्रार मुख्याधिकारी गांभीर्याने घेतील का?
असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972882440

Post a Comment

0 Comments