वडिलांच्या छत्राखाली तर नाहीच, पण परिस्थितीच्या आव्हानांवर मात करीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रकाशात आणण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहेत.
गेल्या 24 वर्षांपासून चालणाऱ्या या उपक्रमामुळे, अनेक अनाथ आणि उपेक्षित मुलांचे जीवन उजळले आहे.
संचालक विनोद जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली, दरवर्षी शंभरावर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे हे एकमेव केंद्र समाजात प्रेरणादायक उदाहरण ठरत आहे. प्रशांत एकनाथ चौधरी या विद्यार्थ्याने जाधव क्लासेसची साथ इ. 8वीपासून घेतली आहे. वडिलांच्या निधनानंतर, प्रशांतने शिकण्याची जेवढी आशा ठेवली, तितकीच त्याच्यासोबत त्याची बहीण नेहा देखील मोठ्या मनाने शिकत आहे.
जाधव क्लासेसचा उद्देश या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवणे हा आहे.
संचालक विनोद जाधव यांचा उदात्त हेतू सर्वांच्या नजरेत आहे. ते म्हणतात की, शिक्षण फक्त ज्ञान नाही, तर एक अशी शक्ती आहे जी समाजात बदल घडवू शकते!
विनोद जाधवसर, आपल्या उदात्त हेतूला सलाम व असेच कार्य आपले हस्ते घडत राहो ही अपेक्षा.
*जाहिरात
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440


0 Comments