विषय छेडणारे संदीप घोरपडे व सहकारींना देखील मिळावे श्रेय!!
खा.स्मिताताई वाघ व मान्यवरांची राहणार उपस्थिती
अमळनेर येथील नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र. 7 मधील जय हिंद कॉलनी, अमळनेर येथील खुल्या भूखंडाचा सर्वांगीण विकास अंतर्गत 77 लक्ष निधीतून निर्माण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण आज शुक्रवार दिनांक 25 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
आ.अनिल पाटील यांच्या शुभहस्ते व खा स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण होणार असून अमळनेर नगरपरिषदेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.सदर भूखंड विकसित करताना याठिकाणी क्रांतिवीर उत्तमराव पाटील व क्रांती वीरांगना लीलाताई पाटील यांचे क्रांतीपर्व स्मारक साकारण्यात आले आहे.तरी समस्त नागरिझ महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, मा.नगरसेवक यांनी या लोकोपयोगी विकासप्रकल्पाच्या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
वीरांगणा लीलाताई यांचे स्मारक उभारणीत माजी नगरसेवक शाम पाटील यांची कल्पकता व परिश्रम सर्वांच्या ध्यानात आहेच परंतु इतके दिवस हे स्मारक गोणपाट टाकून झाकून ठेवले याची चीड येऊन संदीप घोरपडे, बी के सूर्यवंशी, भागवत गुरुजी व सर्व सहकारी यांनी जनतेच्या वतीने लोकार्पण करायचा घेतलेला निर्णय देखील चुकीचा नहोता, किमान त्यांचा हेतू वाईट नहोता हे देखील समजून घेतले पाहिजे.
म्हणून आज लोकार्पण होत असताना टीम शाम पाटील व टीम संदीप घोरपडे यांना तितकेच मानाचे स्थान द्यायला हवे अशी जनभावना आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments