बीटा कॅरोटीन भरपूर असलेले रताळे आहारात असावेत!

जास्तीत जास्त फायद्यांसाठी रताळ्याचे सेवन कशा पद्धतीनं करायला हवं? 
जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
रताळे (Sweet potatoes) तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये नेहमीच्या बटाट्यांपेक्षा प्राधान्याने समाविष्ट करू शकता.
रताळ्याचा अनेक पद्धतींनी आहारात समावेश केला जाऊ शकतो.
नाश्ता असो किंवा दुपारचे अथवा रात्रीचे जेवण असो; हे कंदमूळ केवळ स्वादिष्टच नाही, तर ते अनेक आरोग्यदायी फायद्यांनीही परिपूर्ण आहे. पण त्याचे फायदे मिळवण्यासाठी, ते योग्य पद्धतीने खाणेही तितकेच आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ सांगतात की,
रताळे हे बीटा-कॅरोटीन (व्हिटॅमिन ए)च्या सर्वांत जास्त स्रोतांपैकी एक आहे, हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे. पौष्टिक फायदे वाढवण्यासाठी ते मेदाच्या स्रोतासह जोडले पाहिजेत.
“रताळ्याचा पदार्थ बनविताना त्यात नारळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, तूप किंवा बटर अशा थोड्याशा मेदाचा वापर केल्यास बीटा कॅरोटीनचे शोषण वाढते, जे रोगांशी लढण्यास मदत करते आणि मेंदूचे कार्य, रोगप्रतिकार शक्ती, निरोगी दृष्टी, त्वचा व केस वाढवते,” असे अनेक आहारतज्ञ सांगतात.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापु सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments