पंढरपूर स्पेशल ट्रेन एक देखावा मिरवण्यासाठी?

कोणत्याही सुरक्षा व्यवस्था नसताना वृद्ध वारकरी कोंबले जाऊन विठ्ठल भक्तांची घोर प्रतारणा होण्याची शक्यता!
सुरत भुसावल पॅसेंजरचे दिवस आठवा! किंवा आजही होणारा हा प्रवास अनुभवा.
पंढरपूर स्पेशल ट्रेन उधना येथून निघून नंदुरबार, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव मार्गे रवाना होऊन याच मार्गे परत येणार आहे.. प्रत्येक स्टेशनवर भोळे भाबडे वारकरी गर्दी करणार हे नक्की! जादा डबे लावून किती लावणार? जादा गर्दीने अपघात होऊ नये म्हणून म्हातारे वारकरी यांची सुरक्षा व्यवस्था केली आहे का? याची उत्तरे नाहीत.
रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी हे जनतेला उल्लू बनवत नाहीत का?
दोन्ही रेल्वेचे प्रस्थान व परतीचे वेळापत्रक देखील हास्यास्पद आहेत.. विशेष म्हणजे सुरत भुसावल पॅसेंजर मध्येच सुरत व उधना येथे पाय ठेवायला जागा रहात नाही तर उधना ते चाळीसगाव पर्यंत पंढरपूर जाणाऱ्या भाविकांचे काय हाल होतील?
आणि हे वारकरी अधिकतर 45 पन्नास वर्षावरील असतात.. त्यांचे काय हाल होतील? याचा विचार कुणीच केला नाही. 
वरुन स्टेशन वर झेंडा हलवायला खासदार, आमदार झोकात हजर राहून फोटो काढून मिरवून घेतील हे वेगळे...! मनापासून करायचेच होते तर 4 गाड्या वेगवेगळ्या वेळी सोडल्या असत्या, आणि जाण्या येण्याचे चांगले नियोजन करता आले असते.. 
उद्या नंदुरबार ते चाळीसगाव दरम्यान प्रत्येक स्टेशन वर खासदार, आमदार फोटो सेशन करतील फोटो काढून बातम्या करतील पण कोंबड्या बकऱ्या भराव्या तसे भाविक ट्रेन मध्ये घुसमटतील हे नक्की.. 
येण्या साठीची वेळ पाहिली तर रात्री 12 वाजता पोचणारे भाविक दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत म्हणजे केवळ 12 तासात दर्शन घेऊन स्टेशन गाठू शकतील का? याचे नियोजन करण्याची अक्कल देखील प्रशासनास नसावी? 
एकूणच हा फसवा अजेंडा असून चक्क विठ्ठल भक्तांची फसवणूक आहे असा आरोप सामाजिक अभ्यासक करीत आहेत.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments