झोपेची समस्या? नक्की पुढील अनुभव वाचा.

काही उपाय हमखास अनुभवलेले..
१)रोज नियमित ठराविक वेळी झोपा व ठराविक वेळी उठा.
गजर (बेल) लावून उठायची सवय लावू नका, आपला मेंदू हा सगळ्यात मोठा गजर आहे, त्याला सवय लावा, म्हNजे झोपताना ठरवा की मी केंव्हा उठायचे आहे. अंतर्मनात हा संदेश निश्चित गेला की आपोआप जाग येईल.
२) झोपायच्या एक तास आधी tv मोबाईल पासून अंतर ठेवा, झोपताना मोबाईल आपले पासून दूर राहील याची काळजी घ्या.
३) झोपण्यापूर्वी कोमट पाणी वा दूध घ्या.
४) शक्य होईल तितका कोवळा सूर्यप्रकाश अंगावर येईल याचा प्रयत्न करा, कारण झोपे साठी डी जीवनसत्त्व आवश्यक आहे.
५) संध्याकाळी वा रात्री गोल्डन मिल्क म्हणजे हळद युक्त दूध उत्तम.
६) किमान एक वेलची (हिरवा वेलदोडा) चावून खाल्ला तर गाढ झोप लागते.
७) झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल, तीळ किंवा बदाम तेलाने मसाज करा.
८)हलके मधुर संगीत वा आवडीची उत्तेजित न करणारी मंद गाणी वा संगीत ऐका.
आहारात कॉफी वा चहा सायंकाळी असूच नये.
९)रात्री जड व टेलकट पदार्थ खाणे टाळा.
१०) व्यावहारिक, संसारिक अडचणी आदी विषय असतील तर 'उद्या जे व्हायचे ते होईल' आता शांत झोपूया असे अंतर्मनास सांगून निद्राधीन व्हा.

आणि शांत झोप यावी म्हणून गोळ्या घेणे टाळा.
मनाची तयारी, निर्धार हा सर्वोत्तम उपचार आहे.
असे अनेक अभ्यासक सांगतात..
माझा तर स्वानुभव आहे.. झोप म्हटले की मी झोपतो व उठ म्हटले की उठतो. गजर लावायची गरज नाही पडत.
अगदीच गरज पडली तर एक हिरवी इलायची चघळून झोपलो तर गाढ मोहनिद्रा येते.
मात्र मनात आधीच घोकून ठेवले असते की आवश्यक तेंव्हा मला जाग येऊ दे!
करून बघा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments