अमळनेर तालुक्यात नद्यांमधून (रेती) वाळू उपसा करण्याचे मांडळ, सावखेडा, जडोद, बोहरा, रुंदाटी, मुंगसे, असे एकूण 15 ठिकाने आहेत. परंतु अमळनेर तालुक्यात शासनाकडून गौण खनिज (वाळू) लिलाव प्रक्रिया (ठेकेदारी) झालेली नाही. म्हणजे कायदेशीर रित्या बांधकामासाठी तालुक्याचया नदीतून वाळू मिळतच नाही. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, तालुका भर अमर्याद लहान, मोठी बांधकामे सुरू आहेत. म्हणजेच तालुक्यातील नद्यांमधून वाळूचा वारे माप उपसा बेकायदेशीर रित्या सुरू आहे. बिनधास्त वाळू चोरी सुरू आहे.
यामुळे एक तर शासनाचा महसूल बुडत आहे. बांधकाम करणाऱ्यांना बेकायदेशीर वाळूचे जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. जनतेची आर्थिक लूट होत आहे. वाळू माफियांची बेबंध शाही व गुंडगिरी वाढत आहे. रात्री बे रात्री वाळू माफी यांच्या ट्रॅक्टरच्याआवाजाने लोकांची झोप खराब होत आहे. आणि शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी ची बदनाम होत आहे.
तसेच वाढू माफिया तरुणांना नशा पान व पैशांची लालूच दाखवून रात्रीचे वाळू चोरीचे काम करीत आहेत. परिणामतः तरुण व्यसनाधीन होत आहेत.
अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी व जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय प्रांताधिकारी मयुरजी भंगाळे यांना पत्र दिले व त्वरित गौण खनिज लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केलेली आहे, व असाच बेकायदेशीर वाळू उपसा होत राहिला तर, काँग्रेस पदाधिकारी आक्रमकपणे आंदोलन छेडणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments