'खाशि'त आशिर्वाद विरुद्ध दुसरा पहिलवान मैदानात आल्याने कुस्ती रंगणार!

खाशि संग्रामात अखेर दुसऱ्या पॅनल ची होणार घोषणा!
खानदेश शिक्षण मंडळाचे निवडणूकीत आशिर्वाद पॅनल ने उमेदवार घोषित करून जोरदार प्रचारास सुरुवात केली तरी त्यांचे विरोधात पॅनल गठीत झालेले नसल्याने अपक्ष विरुद्ध आशिर्वाद अशी लढत होईल की काय असे चित्र निर्माण झाले होते. 
परंतु आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या व अखेर माजी आमदार डॉ. बि.एस. पाटील यांचे नेतृत्वाखाली नव्या पॅनलचे गठन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 
अजय केले, डॉ अविनाश जोशी, डॉ चंद्रकांत पाटील, जितेंद्र झाबक, प्रवीण जैन, आदी उमेदवार या पॅनल मध्ये असतील अशी अटकळ आहे. 
नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी उद्या पॅनलचे नाव व सर्व  उमेदवार घोषित होतील असे सूत्रांनी सांगितले. 
या मुळे आशिर्वाद विरोधात लढत द्यायला सक्षम पहिलवान मैदानात उतरला असल्याने खा.शि. निवडणुकीत रंग भरणार आहे!
सविस्तर उद्या. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 

Post a Comment

0 Comments