अमळनेर मराठी साहित्य परिषदेत दाम करी काम? अर्ध्याअधिक बिगर साहित्यिकांचाच भरणा!

कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने गठीत करा! 
अमळनेर येथील मराठी साहित्य परीषद साहित्यशून्य लोकांचा कंपू बनला असून साहित्य क्षेत्रात पात्रता नसलेल्या लोकांची घुसखोरी झाल्याचे दिसत आहे.
ज्यांना साहित्य कशाशी खातात याची जाण नाही असे लोक पदावर मिरवत असून मसापच्या मूळ हेतूस बगल देण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोप आहे. 
ध्वनी मुद्रित मुलाखतीत एका जबाबदार पदाधिकारीस विचारले असता त्यांनी सांगितले की, 'ज्यांनी मोठी रक्कम दिली त्यांनाच घेण्यात आले आहे.' याचा अर्थ असा की साहित्य क्षेत्रात आता साहित्य सेवा, साहित्य निष्ठा वगैरे पेक्षा पैशाचे मोल केले जात असून दाम करी काम हे व्यापारी धोरण राबवले जात आहे.
           अमळनेर ही साहित्यिक वारसा लाभलेली भूमी असून इथे अगदी कुमारवयीन ते वयोवृद्ध साहित्यिक, साहित्य रसिक व धडपडणारे लोक आहेत त्यांना डावलून मूठभर टोळीने आपल्या सोयीचे लोक जवळ करून निष्क्रिय व साहित्य शून्य लोकांचा कंपू बनवला असल्याने साहीत्य प्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. 
केवळ पैसे दिले म्हणून कोणत्याही व्यक्तीला पदाधिकारी करणार असाल तर गडगंज पैसा असलेले परंतु साहित्य क्षेत्राशी सुतराम संबंध नसलेले किमान दोन डझन लोकांची यादी आपल्याकडे असून ते मसापला मोठी देणगी देण्यास तयार आहेत त्यांना कार्यकारिणीत घेणार का? असा माझा सवाल असून विद्यमान कार्यकारिणीत किती साहित्य सेवक किंवा जाणकार आहेत? त्यांचे कोणते कर्तृत्व पाहून पदावर सामावून घेण्यात आले आहे? याचा खुलासा झाला पाहिजे. 
आदरणीय कवि बी एन चौधरी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान वादातीत असले तरी धरणगाव येथून ते अमळनेर स्थायिक झाल्याने त्यांना सामावून घेतले आहे का? याचे उत्तर देखील मिळायला हवे. 
अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी पदभार स्वीकारल्या पासून काही देखणे कार्यक्रम व उपक्रम राबविले व  साहित्य क्षेत्रातील जाणकारच या कार्यात असावेत हा त्यांचा हेतू ते जाहीर बोलून दाखवत असले तरी प्रत्यक्षात मात्र कार्यकारिणीत अपवाद वगळता साहित्यशून्य लोकच विराजमान आहेत आणि ही लाज वाटायला लावणारी बाब आहे.
           मसापच्या जिल्हा व राज्य पदाधिकारींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करून पुनर्रचना करावी तसेच 'ज्यांना साहित्यातील काही कळत नाही त्यांनी थोडी जरी 'चाड' असेल तर जागा अडवून ठेवण्या पेक्षा स्वतःच राजीनामा द्यावा' असे आवाहनही करीत आहोत. 
वाचक, साहित्यिक व नागरिकांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया (सकारात्मक/नकारात्मक कशीही असली तरी) जरूर नोंदवावी.
-धनंजय सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments