विकाऊ मतदार संघ हा शिक्का पुसायचा असेल तर 'विकणारे' नको 'विकत घेणारे' बना!
-संदीपराजे घोरपडे यांचे कळकळीचे आवाहन.
पूज्य सानेगुरुजी, प्रतापशेटजी व संत सखाराम महाराज यांची भूमी असलेले अमळनेर आर्थिक व सामाजिक दृष्टया अद्याप विकसित झालेले नाही.
अशात ठोस विकास करणारे नेतृत्व उदयास आले नाही.. रोजगार नाही, शेतकरी कामकरी यांचे प्रश्न सुटले नाहीत, जलसाठे नसल्याने गावोगावी टँकर सुरू आहेत, शिक्षणाची दुरावस्था आहे.
वरून विकाऊ मतदार असा बदनामीचा शिक्का लागला असताना सर्वच 'अर्थ'पूर्ण विचार करून मैदानात उतरताना दिसत आहेत..
या पॉर्षंभूमीवर माजी आमदार गुलाबरावबापू यांचे वारसदार संदीपराजे घोरपडे यांनी सातत्याने लोकोपयोगी कामे करून आशावादी चेहरा म्हणून लक्ष वेधले आहे.
विकले जाऊ नका मला फक्त दहा रुपयात विकत घ्या असे संदीपराजे घोरपडे यांनी आवाहन केले आहे.
दहा रुपये व बहुमोल मत देऊन मला विकत घ्या मी मतदार संघातील निराशा दूर करेल असा विश्वास ते लोकांना देत असून जनता देखील त्यांना भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे.
दहा रुपये व मत देऊन मला विकत घ्या या संदीपराजे घोरपडे यांच्या अनोख्या मोहिमेला यश मिळेल का? हे येणारा काळ सांगेल पण प्रामाणिक लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता संदीपराजे घोरपडे अमळनेर मतदार संघाचे नेतृत्व करतील असे जाणकारांचे मत आहे.
तीन वेळा विधानसभा गाजविणारे दिवंगत गुलाबराव बापू पाटील यांचा वारसा पाठीशी असल्याने संदीपराजे घोरपडे यांना मोठा जनाधार आहे.
काँग्रेस पक्षाने तिकीट दिले तर त्यांचा विधानसभा प्रवास अधिक सोपा होऊ शकतो.
शिरिषदादा माष्टर स्ट्रोक मारणार की कृषिभूषण यांची अनपेक्षित एन्ट्री होणार? निवडणूक विश्लेषण भाग -3 उद्या!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments