अमळनेरचे तत्कालीन आमदार शिरीषदादा यांनी कल्पकता दाखवून जर तापीतीरावर 10 कुपनलिका आणि कलाली पाईप लाईन केली नसती तर आज अमळनेरला देखील लातूर सारखे रेल्वेने पाणी आणावे लागले असते! असा दावा मॅनेजमेंट गुरू डॉ रवींद्र चौधरी यांनी केला आहे.
तापी आवर्तनाची वाट पाहून महिना-महिना पाणी मिळाले नसते, शिरिषदादा चौधरी यांनी त्या काळात केलेल्या कामा मुळेच आज 5-6 दिवसात तरी शहरात व तालुक्यात पाणी मिळत आहे.
पारोळा भोकरबारी धरणात पाणी नहोते, जाता येता मन जळायचे.. अनेक गाव पाणी पाणी करत असताना मी म्हणजे दस्तुरखुद्द धनंजय सोनार यांनी सर्व लोकप्रतिनिधी, पुढारीना फोन करून लक्ष वेधले.. शिरिषदादा माजी आमदार असून माझे विनंतीवरून संबंधित विभागास भिडले व भोकरबारी धरण भरले..
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, उड्डाणपूल ही शिरीषदादा यांची देन आहे. तालुक्यातील अनेक विकासकामे कायमस्वरूपी लक्षात राहतील अशी शिरिषदादा चौधरी यांचे काळात झाल्याचे सर्वज्ञात आहे.
म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा जनाधार मिळेल असा विश्वास त्यांचे समर्थकाना आहे.
विशेष म्हणजे ना.अनीलदादा पाटील, संदीपराजे घोरपडे, डॉ अनिल शिंदे, कृषिभूषण साहेबरावदादा पाटील, नव्याने आलेले प्रकाशभाई पाटील इच्छुक असताना बहुसंख्य मराठा उमेदवार असताना शिरिषदादा यांचा मार्ग सुकर होईल का?
त्यातही ऍड.ललिता पाटील, स्मिताताई वाघ, डॉ बी एस पाटील, यांची भूमिका काय असेल? ते कुणाचे बाजूने उभे राहतील?
तूर्तास तरी,मजबूत लोकसंग्रह व नियमित गाठी-भेटी असलेले शिरिषदादा चौधरी यांना उज्वल भविष्य आता तरी दिसते आहे.
■आगामी आकर्षण■
नामदार अनिलदादा यांचे भवितव्य काय? विकासकामे सांगून ते पुन्हा मारतील का बाजी? निवडणूक विश्लेषण भाग-५
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972871440




0 Comments