अमळनेर विधानसभा मतदार संघात विराट कुस्त्यांची दंगल सुरू झाली आहे..
काही अती आत्मविश्वास दाखवून 'झोपले' आहेत तर काही जोरदार 'तालीम' करीत 'मैदानात' उतरले आहेत..
खरे तर 'बघे' म्हणजे मतदारात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे..
■ माजी आमदार शिरीषदादा - bjp फडणवीस, महाजन यांचे मित्र असले तरी निवडणूक लढतीलच!
■अनिलदादा पाटील- (bjp युती ) विद्यमान आमदार व मंत्री युती असल्याने जागा त्यांनाच सुटू शकतेच..
■स्मिताताई bjp खासदार झाल्या तर भैरवी साठी आग्रह धरतील किंवा लोकसभेचा निकाल विरोधात गेला तरी अमळनेरला लीड आहे म्हणून विधानसभा मलाच लढू द्या असे सांगतील..
■कृषिभूषण साहेबरावदादा यांनी भाजपा सोडली असे स्पष्ट होत नाही.. व ते देखील इच्छुक असल्याने विकासकामांचा दाखला देत त्यांचा दावा कायम आहे! अपक्ष की भाजपा की कलाटणी देऊन शरद पवार यांचे तिकीट ते घेतील या बाबत तर्क वितर्क आहेत..
मग भाजपाचे नक्की दावेदार कोण?
उमेदवारी कुणास?
त्या विरोधात
डॉ अनिल शिंदे
व
पण संदीप घोरपडे व अनिल शिंदे जोरदार तयारीस लागले असल्याने दोघांत तडजोड होते की अपक्ष अथवा अन्य पक्षाचे तिकीट मिळवितात हे बघणे मनोरंजन करणारे ठरेल.
तूर्तास तरी भाजपा, शिंदेंसेना, अजित राष्ट्रवादी यांची युती असल्याने शिंदेंसेना/भाजपा यांना व जागा काँग्रेस ला सुटली तर उद्धव सेना तथा शरद पवार गट यांचा उमेदवार नसेल..!
विकाऊ मतदार असा शिक्का लागल्याने आणखी कुणी एक दोन अपक्ष उमेदवार येऊ शकतात...
एका अर्थी वरील सर्व पक्षाचे उमेदवार मराठा समाजातील असतील व सर्वच आर्थिक सक्षम आहेत..
भाजपा उमेदवारी प्रकाश भाई यांना मिळाली तर अनिल भाईदास अपक्ष लढतील का,? किंवा जोरदार तयारी करणारे प्रकाश पाटील अपक्ष उमेदवारी करतील का? हा प्रश्न आहे.
माजी आमदार व लोकप्रिय असलेले शिरीष दादा यांना देखील अपक्ष लढावे लागेल का?
की प्रकाश पाटील अन्य पक्षाचे तिकीट घेतील?
काँग्रेस चे तिकीट संदीप घोरपडे यांना की डॉ अनिल शिंदे यांना?
हा संभ्रम आहे!
कुणी सांगेल का नक्की काय होईल आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडा'मोडी' घडणार?
हा प्रश्न मतदारांना पडला आहे.
सविस्तर पुढील भागात.
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440







0 Comments