विधानसभेची निवडणूक हाकेच्या अंतरावर असतानाच प्रकाशभाई पाटील झाडीकर खरेतर गुजराथकर यांनी जोरदार आगमन करून धुरळा उडविला आहे. आधी फ्लेक्स लावून जाहिराती, जनसंपर्क, पत्रकार परिषद व थेट संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.. असा प्रवास केवळ महिनाभरात केला असल्याने प्रकाशभाई यांनी अप्रत्यक्षपणे प्रचारात आघाडीचे घेतली आहे असे दिसते..
रोजगार देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. गुजराथमध्ये मोठे व्यावसायिक असलेले व माजी पोलीस अधिकारी असलेले प्रकाशभाई पाटील लवकरच किमान 400 लोकांना रोजगार देणार असे त्यांनीच स्पष्ट केले आहे.
विविध समाजातील लोकांना एकत्र आणण्यात त्यांनी आता तरी यश मिळवले असल्याचे दिसत असून प्रस्थापित राजकीय नेत्यांना ते नक्की धक्का देणार हे निश्चित आहे.
असेही नव्याला डोक्यावर घेणे ही अमळनेरात जणू पद्धत आहे.
या पूर्वी डॉ बी एस पाटील यांनी राजकीय पोकळीतून संधी साधली, साहेबरावदादा यांनी विविध संस्था व समाजाला लाखो रुपये जाहीर देणगी देत निवडणूक जिंकली,
शिरिषदादा चौधरी यांनी त्याची पुढची स्टेप गाठत मॅनेजमेंट गुरू डॉ रवींद्र चौधरी याचे कुशल मार्गदर्शन घेत मुंबई गाठली!
आता अवघे आयुष्य गुजराथ मध्ये घालविलेले अमळनेर झाडी येथील प्रकाशभाई पाटील यांचे अमळनेर मतदार संघात सर्वत्र स्वागत होत आहे.
प्रकाशभाई यांची जोरदार एन्ट्री अनेकांना धक्का देणारी असून त्यांच्या पाठीशी पाटील समाजात मिळणारी सहानुभूती नक्की कोणत्या पाटलाला झटका देईल या बाबत शंका कुशंका व्यक्त होत आहेत..
बहुसंख्य मराठा समाज असल्याने
संदीप घोरपडे,
पण सध्या तरी प्रकाशभाई यांचे जोरदार स्वागत होत असल्याने पत्रकार बांधव व सर्वांची भर उन्हात देखील 'दिवाळी' होत असल्याचे दिसत आहे.
आपणच भावी आमदार अशी स्वप्ने रंगविणारे तूर्तास गाफील असल्याचा फायदा प्रकाशभाई घेत असल्याने पुन्हा तिसरा 'बाहेरचा' आमदार अमळनेर मतदार संघास मिळाला तर नवल वाटायला नको!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440






0 Comments