88-89 च्या काळात चोपडा येथील श्याम मानव आयोजित शिबिरात अमळनेर येथून आम्ही 13 लोक गेलो होतो..खरा दिलीप तेथेच गवसला... गळ्यात पडला अन कायमचा चळवळीतील सोबती झाला..
त्या आधी आम्ही प्रताप महाविद्यालय गाजविले.. अनेक उपक्रम, वादविवाद, आंदोलन असा प्रवास मिसरूड न फुटलेल्या वयात करीत वाटचाल सुरू होतीच..
दिलीप सेंट्रल बँकेत नोकरीस लागला.. बहुदा आमच्या परिवारातील तो पहिला किंवा दुसरा असावा ज्याला ठोस नोकरी मिळाली..
दिल्या, नोकरीस लागला, मुंबई, नागपूर, पारोळा, हातेड.. कुठे कुठे भटकंती करून आला पण त्याची अमळनेरशी असलेली नाळ तुटली नाही,.
सातपुडा भ्रमण त्याने घडविले.. धर्मा दादा असायचे सोबत, दिलीप सातपुड्यात ज्या उत्साहाने पशु,-पक्षी, झाडे-फुले, आदिवासी संस्कृती यात रमताना आमच्या सोबत अनेर, गुळ नदी वा सातपुड्यातील दऱ्या खोऱ्यात कसा विरघळून जायचा ते समजायचे देखील नाही.
हरहुन्नरी
उत्तम हताक्षर असलेला, पुस्तकात रमणारा, मूर्ती कलेचा व्यासंग असलेला
कलावंत,
मित्र जमविण्यात त्याची हातोटी,
संतापी देखील असा की अपमान सहन न करणारा.. राग त्याचे जणू नाकाच्या शेंड्यावर,...
पण प्रेम असे की सागराचा ठाव लागेल पण दिलीपच्या प्रेमाचा तळ गाठणे अवघड..
पहिला पाऊस पडला की दिलीप शोधत येतो: चला भिजायला, पाऊस पडताच बेडकांच्या आवाजात मस्त गप्पा मारायला ठिकाण तोच निवडत असे.. सोबत रसिक मित्रासोबत 'बसायचे' साधन असावे याची काळजी देखील तो काटेकोर घेत असे व गुपचूप पैसे देऊन ती सोय करायची जबाबदारी एखाद्यास देत असे.. अलीकडे अंतर पडले खरे.. पण उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतात तसे करेलही तो,.
नाटक, कविता, विद्रोही साहित्य असो की राजकारण सर्व विषयात अभ्यासपूर्ण सहभाग देणारा दिलीप मित्रांच्या अडचणीत देखील धावून जात आला आहे.
बहुजन समाज पक्षाचे अमळनेर विधानसभा तिकीट मला मिळाले व लोकसभा मतदार संघाचे तिकीट गौतमला मिळाले तेंव्हा स्वतः शोधत येऊन मोठी मदत देणारा दिलीप आजही जसाच्या तसा आठवतो.
अलीकडे अंबरीश टेकडीवर रमलेला आमचा दिल्या बोलता बोलता साठ वर्षांचा झाला.. नुकताच बँक सेवेतून देखिल निवृत्त होत आहे.. सामाजिक बांधिलकी जपणारा हा अवलिया मित्र माणुसकी विसरला नाही,
दिलीप दादा,
तु सेकंड ईनिंग साठी पुन्हा पॅड बांधून सज्ज झाला आहे, खरे तर तू इतका बेडर आहेस की तुला ना 'पॅड'ची गरज ना 'हेल्मेट'ची!
दादा,
वाढदिवस
निवृत्ती,
व
दुसऱ्या डावाच्या पहिल्या सलामीस तुला शुभेच्छा.
खूप प्रेम,.
राजूदादा सोनवणे, संजीवकुमार, पप्पू, भावशा, राजहंस टपके, गौतम, विजय 22कर, घोरपडेसर, धर्मादादा, भारती, जगदीश अशा कितीतरी मित्रांच्या सोबत असलेल्या अनेक आठवणी आहेत..
दादा, दुसरा डाव अधिक रंगतदार होईल हे निश्चित!
पुन्हा शुभेच्छा!!
-धनंजय सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440



0 Comments