या आंदोलनामुळे आपल्या समाजास व आपल्याला हवे असलेल्या टोकरे कोळी ( एस. टी. ) चे सरसकट दाखले मिळावे यासाठी ऐतिहासिक असा निर्णय मार्गी लागू शकतो म्हणून चोपडा, अमळनेर पंचक्रोशीतील सर्व आदिवासी कोळी समाज बांधव या आंदोलनात सहभागी झालेत.
आपल्या समाजाविषयी सरकारने जे झोपेचे सोंग घेतले आहे त्यांची झोप मोड करून आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आहे म्हणून 'उठ कोळी बांधवा जागा हो संघर्षाचा धागा हो' अशा घोषणा देण्यात आल्या,. सकाळी 12 वाजेच्या सुमारास
अमळनेर येथील तिरंगा चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने आदीवासी कोळी बांधव जमले. घोषणा देत प्रांत कार्यालयाकडे रवाना झाले.
सदर मोर्चा तिरंगा चौक, पाच पावली, बस स्टॅन्ड, विजय मारुती मार्गे प्रांत कार्यालयावर पोचला, पाऊस व शेतीची कामे असताना देखील महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती नोंद घेण्यासारखी आहे. शासनाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments