खातरजमा न करता पत्रकार बांधवांवर गुन्हे नोंद झाल्याची राज्यभर ओरड आहे! अमळनेर येथे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनार यांचेवर असाच ऐकीव माहितीवर गुन्हा दाखल झाला, त्या कारणे पत्रकार बांधवांनी तात्काळ निवेदन दिले होते, त्या नंतर देखील त्यांचेवर 110 प्रमाणे कारवाई करण्याची धमकी देण्यात आली होती, जी बेकायदेशीर असल्याचे धनंजय सोनार यांनी तपास अधिकारी व त्यांचे लघुलेखक यांना स्पष्ट केले.
तरीही प्रोसेस सुरू असल्याचे लक्षात आल्याने पत्रकार बांधव, आजी माजी आमदार याचे लक्ष वेधण्यात आले.
आज या संदर्भात पत्रकार बांधवांनी पोलीस महासंचालक ते सर्व संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणी लक्ष वेधून या गुन्ह्यात ब समरी प्रोसेस करा अशी मागणी केली आहे.
राज्यभर पत्रकार बांधव अशा प्रकारास सामोरे जात असून त्यांना सन्मानाने वागणूक देण्यात यावी व खातरजमा न करता गुन्हा दाखल करू नये अशी विनंती व्हॉइस ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हा उपाध्यक्ष शरद प्रभाकर कुलकर्णी, रवींद्र मोरे, जयवंत वानखेडे, अजय भामरे, उमेश धनराळे, बापूराव ठाकरे, विनोद कदम, गौतम बिऱ्हाडे, भरत पवार, राहुल पाटील, संजय सूर्यवंशी, विशाल मैराळे, उमाकांत ठाकूर, प्रवीण बैसाणे, रजनीकांत पाटील, मधुसूदन उंबर आदी अनेक पत्रकारांनी केली आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजय सोनार
7972881440


0 Comments