कृषिभूषण यांनी ठोकले दंड ! ज्यांचे साठी 'त्याग' केला त्यांची 'घरवापसी' करणार का?

शिरिषदादा व कृषिभूषण यांच्या  लढतीत तिसराच पाय घालणार का?
उमेश पाटील, सचिन बाळू पाटील यांना डावलून शरद पवार कृषिभूषण साहेबरावदादा यांनाच देणार का संधी? 
अमळनेर विधानसभा मतदार संघात डझनभर उमेदवार विविध पक्षाचे वतीने रिंगणात येण्याची तयारी करीत आहेत, काहींना व्यायामाचा सराव आहे तर काही 'कसरत' करीत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटा कडून चक्क तीन ते चार उमेदवार तयारीत असल्याचे दिसते त्यात साहेबरावदादा आघाडीवर असतील असे आता तरी दिसत आहे. 
काँग्रेस कडून संदीपराजे घोरपडे, डॉ अनिल शिंदे यांच्यात चुरस राहील त्यातही तिसरे कुणी आघाडीवर आहेत म्हणे!  वंचित बहुजन आघाडी, बसपा, सपा इथे प्रत्येकी 2 हजार च्या जवळपास म्हणजे शून्य आहे, आणखी एखादा नोट की बात करनेवाला अपक्ष आला तर नवल वाटायचे कारण नाही.
ना.अनिलदादा विद्यमान आमदार असल्याने त्यांना तिकीट मिळण्याची अडचण येईल असे वाटत नाही. पण सुरत येथून झाडी गावाचे प्रेम दाटून आलेले भाई देखील मैदानात सराव करीत असून गुज्जू भाईशी असलेले संबंध पाहता ते तिकीट घेऊन गेले तर? हा विषय देखील चर्चेचा ठरला आहे 
खा स्मिता वाघ, ऍड ललिता पाटील, डॉ बी एस पाटील शांत बसतील ही शक्यता कमीच आहे म्हणून यांच्या भूमिका देखील महत्वाच्या ठरणार आहेत, 
एकूणच अपक्ष निवडणूक लढवु अशी भूमिका घेणारे व मागील वेळी थोड्या मताने पराभूत होणारे शिरिषदादा चौधरी व कृषिभूषण साहेबरावदादा यांच्यातच खरी लढत होईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. 
विशेष म्हणजे कृषिभूषण साहेबराव व शिरिषदादा यांनी केलेले विकासासाठीचे प्रयत्न सर्वांचे स्मरणात आहेत.. 
यात नक्की कोण सरस हे मतदार ठरवतील पण भूमिपुत्र म्हणून अनिल भाईदास पाटील यांचे निमित्ताने अमळनेर मतदार संघास पाहिले मंत्रिपद मिळाले हे दुर्लक्षित करता येणार नाही, हा जनतेत असलेला अभिमानाचा स्वर व  मंत्रिपदाचा लाभ तालुक्यातील जनतेला किती मिळाला हे पटवून देण्या साठी अनिलदादा यांना मोठी मेहनत करावी लागेल हे नक्की! 
त्यातही कॉंग्रेस नेते संदीपराजे घोरपडे व डॉ अनिल शिंदे हे एकत्र आले तर अनिल दादा यांची अडचण वाढू शकते. 
कृषिभूषण साहेबरावदादा यांनी विजनवास त्यागून घेतलेली उडी देखील अनिलदादा यांची डोके दुखी ठरणार यात शंका नाही. 
थोडक्यात शिरिषदादा व कृषिभूषण यांच्यातच लढत होईल असे आजचे तरी चित्र आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments