श्रावणधारा बरसतात तसे सृजनशील मनातून काव्य देखील प्रकटत जाते, हळव्या मनातून अनेक विषयांवर काव्य रूपातून भाष्य केले जाते, अशा भावना व्यक्त करणाऱ्या सर्व कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विषयाचे कोणतेही बंधन नसलेल्या या राष्ट्रीय काव्य स्पर्धेत आपली शब्द धारा बरसू देत असे आवाहन लोकहितवादी परिवाराने केले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र गोवा सह देशातील कुणीही व्यक्ती मराठी भाषेतील कोणत्याही विषयावरील काव्य रचना सादर करू शकतो. काव्य रचना स्वरचित व अप्रकाशित असाव्या. स्पर्धेत सहभागी होणारे कवी दोन रचना सादर करू शकतात.
तटस्थ मान्यवर कवीं परीक्षण करून निर्णय देतील जो बंधनकारक राहील, या स्पर्धेतील प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे 2100, 1100, 700 रुपयांचे तसेच उत्तेजनार्थ 5 कवींना 200 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपल्या रचना, पासपोर्ट फोटो, संपर्क क्रमांक, प्रवेश शुल्क व पूर्ण पत्त्यासह धनंजय सोनार, लोकहितवादी पत्रकार, 'अभियान', देशमुख वाडा, अमळनेर (जळगाव) 425401 या पत्त्यावर किंवा 7972881440 या व्हाट्सएप क्रमांकावर पूर्ण नाव, पत्ता, फोटो व संपर्क क्रमांकासह दिनांक 9 ऑगस्ट 24 पूर्वी पाठवाव्या. सोबत 50 रुपये प्रवेश शुल्क 7972881440 या क्रमांकावर गुगल अथवा फोन पे द्वारे पाठविणे अनिवार्य आहे. 'श्रावणात बरसू देत काव्य धारा' स्पर्धे साठी आपल्या रचना व प्रवेश शुल्क नेमक्या पोचल्या याची खात्री करून घ्यावी. स्पर्धेचा निकाल 15 ऑगस्ट 24 रोजी जाहीर केला जाईल असे लोकहितवादी पत्रकार धनंजय सोनार यांनी स्पष्ट केले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments