मागील निवडणुकीत चौधरी (नॉन पाटील?) विरुद्ध पाटील असा लढा (खरेतर रंगतदार सामना!) न.प. व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत लोकांनी पाहिला. शिरिषदादा यांचे सोबत राहून देखील उदय वाघ, स्मिताताई, ललिताताई, साहेबरावदादा यांनी अचानक अंतर्गत युती करीत अनिलदादा पाटील यांना समर्थन देत पक्ष विरोधी कारस्थान केल्याचे लपून राहिले नाही!
मी त्याग केल्याने हे घडले हे कृषिभूषण यांचे सूचक उद्गार देखील लपलेले नाहीत!
पण त्याग करून देखील कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांचेवर अन्यायच झाल्याची त्यांचे समर्थकांची भावना लपून राहिली नाही.
मात्र शिरिषदादा चौधरी व कृषिभूषण दादा यांनी केलेली विकासकामे कुणीही विसरू शकत नाही. त्या मुळे त्यांना मोठी सहानुभूती मिळण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.
या वेळच्या विधानसभा निवडणुकीत सर्व मराठा समाज एक झाला व मागील निवडणुकी सारखे 'आपला दादा' म्हणून मोहीम चालविली तर कृषिभूषण साहेबराव पाटील पुन्हा एकदा विधानसभा गाठू शकतील.
पण सध्या तरी अनिलदादा पाटील, ललिता पाटील, प्रकाश पाटील, संदीपराजे घोरपडे, डॉ. अनिल शिंदे असे अनेक मोठे मराठे चेहरे मैदानात असून यांची अपेक्षा व इच्छा आयत्या वेळी कोण काय निर्णय घेणार? यावर पुढील दिशा ठरणार आहे!
काँग्रेस कडून संदीपराजे घोरपडे, डॉ अनिल शिंदे यांनी जोरदार आघाडी घेतली आहे, शिरिषदादा चौधरी यांनी दंड थोपटले आहेत, साहेबरावदादा मागे राहिले नाहीत,त्यांनी देखील मोहीम हाती घेतली आहे.
सुरत येथून येऊन उशीरा आपल्या गावाची आठवण आलेले प्रकाशभाई माघार घेतील असे वाटत नाही, ऍड ललिता पाटील शांत बसतील असे दिसत नाही, खासदार झालेल्या स्मिताताई देखिल गप बसतील असे चित्र नाही.
अन्य अपक्ष व आयत्या वेळी उगवणारे चेहरे आगामी विधानसभा निवडणुकीत रंगत आणतील.
तूर्तास शिरिषदादा चौधरी, अनिलदादा पाटील, कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांच्यात मोठी लढत दिसत असुन संदीपराजे घोरपडे त्यांना चकमा देणार की प्रकाशभाई पाटील 'मोठी भेट' देऊन पंगतीत डुक्कर घालुन अनेकांचे स्वप्न भंग करणार? हे येणारा काळ सांगेल!
पण सध्या तरी माजी आमदार शिरिषदादा चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव दादा, विद्यमान मंत्री अनिलदादा यांचीच चर्चा दिसून येत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments