अमळनेरचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी व त्यांचे मॅनेजमेंट गुरू डॉ रवींद्र चौधरी हे पहिला फोन जाताच उत्तर देतात व अडचण समजून घेतात. चुकून कार्यमग्न असले तरी त्यांचा रिटर्न कॉल येतो म्हणजे येतोच. ही कौतुकास्पद बाब अनेकांच्या लक्षात असेल.
कुणी पीए वा चमचा फोन घेत नाही, नक्की अडचण समजून घेतली जाते, शक्य ती मदत केली जाते, व पाठपुरावा सुरू केला जातो असा एकमेव माजी आमदार व मॅनेजमेंट गुरू डॉ रवींद्र चौधरी यांचे बद्दल अनुभव आहे,
अनेक आजी माजी आमदार व भावी फोन घेत नाहीत, मिस कॉल पाहून देखील उत्तर देत नाहीत, त्यांचे पीए वा चमच्यांना प्रत्यक्ष वा फोन द्वारे निरोप दिला तरी त्यांचे पर्यंत निरोप पोचतो की निरोप पोचून ती व्यक्ती प्रतिसाद देत नाही? कळायला मार्ग नाही.
चौधरी बंधू काही रिकामे नाहीत, मोठ्या व्यवसाय व राजकारणात ते देखील बिझी आहेत, तरी देखील ते प्रत्येक फोन/संदेश अटेंड करतात.. ही अनोखी कला त्यांना अवगत आहे.
अन्य लोकप्रतिनिधी व सत्तेत येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी ही कला शिकली पाहिजे.
लोक अडचण असेल तरच फोन करतात व तुमचे कडून अपेक्षा ठेवतात. त्यांना गरजे पुरते वापरून वाऱ्यावर ठेवण्यात काय अर्थ आहे? उत्तर द्यायला नको?
किमान फोन घेतला व प्रश्न समजून घेतला तर नक्की लोक चार चौघात अभिमानाने सांगतात हे पटवून द्यायला हवे इतके बावळट आहात का तुम्ही?
खरेच बिझी असाल तर नंतर देखील फोन करता येईल किंवा दिमतीस असलेल्या कार्यकर्ते कम चमच्याना सांगून विचारणा करायला लावून संबंधित नागरिकांचे समाधान करता येऊ शकते.
या बाबत डॉ रवींद्रबापू चौधरी व माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा आदर्श अन्य लोकांनी घेतला पाहिजे!
आलेले फोन घ्यावे, मेसेज वाचून उत्तर द्यावे, लोकांचे समाधान करावे हे शिकविण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीची शाळा घ्यावी का,?
आमची तयारी आहे! सांगा हक्काने!! केवळ चौधरी बंधू यांचे नव्हे तर लोकसेवा करणाऱ्या सर्वांच्या प्रेमात सदैव !!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments