अमळनेरात तुतारी कोण फुंकेल? कुणाचा वाजेल बँड?

तीन दादांच्या पंगतीत आता उमेशदादा देखील!
कोण जास्त खातो (मते?) या बद्दल जोरदार चर्चा!!
अमळनेर आमदार अनिल पाटील यांना पुन्हा विधानसभा बघू देणार नाही असे जाहीर आव्हान देणारे शरद पवार यांनी एकाच वेळी अनेकांना कामास लावून अमळनेर मतदार संघात वेगळा डाव मांडला आहे.
 राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबरावदादा पाटील या दोघांना पवारसाहेब यांचे कडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याच्या चर्चेस उत आला आहे.
परंतु महायुतीत फूट पडून अनिल दादा कमळावर लढतील व अजितदादा यांचेशी सख्य असल्याने साहेबरावदादा हे घड्याळ चिन्ह मिळवतील अशी शक्यता नाकारता येत नाही असा जाणकारांचा होरा आहे! अशा स्थितीत पिंपळकोठा येथील उमेश पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असल्याने ते तुतारी हाती घेतील अशीच दाट शक्यता आहे.
या अर्थाने उमेश पाटील या नावाचे 'चौथे दादा' अमळनेर विधानसभा मतदार संघात दावा सांगत असून त्यांनी सुरू केलेले कॅम्पेनिंग सूचक आहे.
तरुण व नवीन चेहरा, राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचे उत्तम कार्य, मोठ्या पवारांशी असलेली सलगी आदी पाहता उमेश पाटील यांना तिकीट मिळाले तर नवल वाटू नये.
मात्र त्यांनी अद्याप 'खिशात हात' घातलेले नसल्याची देखील रंगतदार चर्चा आहे.
उमेश पाटील नावाचे हे चौथे दादा किती प्रमाणात यशस्वी होतील? त्यांची कुवत काय? जमा व वजा बाजू कोणती? या बाबत सविस्तर उद्या लोकहितवादी घेऊन येत आहे नवे फिचर!
तूर्तास तरी शिरिषदादा, अनिलदादा, कृषिभूषण साहेबरावदादा, संदीपराजे घोरपडे, डॉ अनिल शिंदे, 'कायपो छे$$' अशी ज्यांची हालत होईल असे म्हटले जाते ते प्रकाशभाई पाटील या इच्छुकांचे पंगतीत 'चौथे दादा' म्हणून उमेश पाटील यांनी 'पाट' मांडले आहे, हे नक्की!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments