आयुष्यात जन्मभूमीची ज्यांना आठवण आली नाही त्यांना गेल्या काही महिन्यांपासून उमाळा दाटून आला आहे. तरुणांना रोजगार नसल्याने त्यांना वेदना होऊ लागल्या असून आता ते रोजगार देऊ म्हणून कामास लागले आहेत.
निवडणूक लढायची का? तर नाही म्हणतात फक्त रोजगार द्यायला मातृभूमीच्या सेवेसाठी आलो असे सांगतात आणि खाजगीत बोलताना तयारी मात्र विधानसभेची सुरू असल्याचे कबुल करतात.
गुजराथ येथून अमळनेर मतदार संघात नोंदणी, कार्यालय, रोड शो, संपर्क मोहीम, पत्रकार परिषद, मित्रमंडळ गठन हे कशाचे द्योतक आहे? हे समजायला कुणी मनगटाने नाक पुसत नाहीत.
अर्थात, लोकशाहीत कुणालाही कुठूनही उमेदवारी करण्याचा, लोकसेवा करण्याचा वा कोणतेही निमित्त साधून प्रसिद्धी मिळवायचा अधिकार असला तरी 'कुणीही यावे आणि टपली मारून जावे' अशी स्थिती आता अमळनेर मतदार संघात तरी राहिली नाही.
लोक शहाणे झाले आहेत, विचार करू लागले आहेत. कुणाची पतंग उंच उडू द्यायची व कुणाची कापायची हे मतदारांनी ठरवून घेतले आहे,
त्या मुळे प्रकाशभाई यांची पतंग 'काई पो छे$$%' म्हणत लोक नाचतील यात आता तरी शंका नाही अशी लोक वंदता आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments