धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील श्यामकांत ईशी यांचा पुतण्या, कृषी विभागाचे निवृत्त अधिकारी रवींद्र ईशी यांचा मुलगा तेजस रवींद्र ईशी (चौधरी) याच्या कथित हत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील 'वाडीव-हे' पोलीस ठाण्यात शहरातील १२ तरुणांविरुद्ध न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये गुन्हा दाखल केला होता.फिर्यादी रवींद्र चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मयत तेजसचा मित्र हृतिक जैन याचा 27 ऑक्टोबर 2022 रोजी वाढदिवस होता.
तेजस आणि त्याचे मित्र नाशिक जिल्ह्यांत मँगो व्हिला रिसोर्ट येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते.
तेथून रात्री उशिरा केतन भंडारी यांनी तेजसचे काका डॉ. सुनील चौधरी यांना फोन करून तेजसची प्रकृती खालावली असून प्रकृती खूपच चिंताजनक असल्याची माहिती दिली. मात्र ते पोहचण्यापूर्वीच मृतदेह नाशिक रुग्णालयात हलविण्यात आला होता. तेजसच्या नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी नाशिकला जाऊन डॉक्टरांशी चर्चा करुन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच तेजसचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी दिली.
तेजसच्या आकस्मिक मृत्यूवर त्यावेळी त्याचे मित्र असंबद्ध किंवा टाळाटाळ करीत अस्पष्ट उत्तरे देत होते. त्यामुळे तेजसच्या आकस्मिक मृत्यूबद्दल वडील रवींद्र चौधरी यांचा संशय अधिकच बळावला. मयत तरुण तेजस ईशी आणि केतन भंडारी यांच्यात 2022 साली वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवा दरम्यान त्यांच्यात भांडण झालेले होते. याची माहिती तेजसने घरी दिली. फिर्यादीनुसार, त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी त्याला वाढदिवसाला पार्टीच्या बहाण्याने नासिक जवळील इगतपुरी नजीक मँगो व्हिला रिसॉर्टमध्ये नेले आणि दारूत काहीतरी विषारी पदार्थ मिसळून त्याची हत्या केली. या प्रकरणी संशयितांमध्ये केतन राजेंद्र भंडारी, ऋतिक नरेश ओसवाल (जैन), गौरव संजय जगताप, प्रेम प्रमोद जैन, सचिन जयवंत पाटील, भावेन पतंगराव मोरे, मयूर रवींद्र कोळी, चिंतन जितेंद्र ललवाणी(जैन), ऋषभ नरेश ओसवाल(जैन), मोहित राजेंद्र कढरे, आनंद शांतीलाल चोरड़िया (जैन) आणि एक अनोळखी व्यक्ती समाविष्ट आहेत. असा आरोप आहे.
या घटनेनंतर सुमारे 15 महिन्या नंतर इगतपुरी न्यायालयाच्या आदेशानुसार 'वाडीव-हे' पोलीस ठाण्यात जानेवारी 2024 ला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र या प्रकरणाला आठ-नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटूनही तेथील पोलिसांकडून काटेकोरपणे तपास करून, आवश्यक ती कारवाई होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत आहे. याबाबत मृत तेजसचे वडील रवींद्र ईशी व कुटुंबीयांनी खंत व्यक्त केली आहे. आणि 'वाडीव-हे' पोलिसांच्या निष्क्रियतेच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिकचे जिल्हाधिकारी, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक, नाशिक उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून न्याय मिळावा म्हणून कुटुंबासह मंत्रालय मुंबई किंवा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मयताचे वडील रवींद्र ईशी व कुटुंबीयांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण ऐरणीवर आले आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments