शिरीषदादा व अनिलदादा यांची जोरदार बॅटिंग पण अमळनेरात 'यांचे' चे अजून ठरेना!

तीसरा उमेदवार वेळ भरून काढेल की कुणाला पाडण्यासाठीच उभा राहील?
अमळनेर मतदार संघात लोकांची मते पक्की होत चालली आहेत.. अनिल पाटील व शिरीष चौधरी यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे, दोघांचे आरोप प्रत्यारोप जोरदार सुरू असल्याने दुरंगी लढत आहे की काय असे चित्र निर्माण झाले आहे!
काँगेसला जागा सुटली म्हणतात पण निर्णय होत नाही, याला तिकीट त्याला तिकीट ह्या बातम्यांना लोक कंटाळले असून अनिल पाटील व शिरीष चौधरी अशा दुरंगी लढतीत लोक गुंतले असून ज्याची त्याची मते निश्चित होत असल्याने तिसरा उमेदवार आलाच तर तो कुणाला घरी आणेल इतकेच त्यांचे महत्व राहिले नाही तर नवल!
तिसरा उमेदवार उशिरा येऊन वेळ भरून काढेल तर चमत्कार शक्य आहे.
अन्यथा 'चंमतग' होऊन हसे होईल!
बातमी पूर्ण होई पर्यंत काँग्रेस, उबाठा वा एस पी राष्ट्रवादी यांचे पैकी कुणाचेही उमेदवार फायनल झाले नहोते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments