पळून गेलो नाही, पळवली नाही
मुली समान कुणाला बायको केले नाही,
बायकोला फसविले नाही, मुलांना वाऱ्यावर सोडले नाही!
संघर्ष करीत
बाबुळ झाड उभेच आहे
मित्राला फसविले नाही!!
मित्राच्या बायकोचा गैर फायदा घेतला नाही!
भावांनाझ-पुतण्याला उल्लू बनवले नाही!
कारण,
एक खांबी तंबू!!
उभाच आहे, उभाच राहणार!!
झुकलो नाही, झुकणार नाही,
हरलो नाही, हरणार नाही!!
'सचोटीला' काखेत मारून ज्याने...
जिला बेटी म्हटले, बाळ म्हटले,
वहिनी म्हटले, आई म्हटले
आणि तरीही 'पदराशी' खेळला..
असा गद्दार मी नाही
नात्यात पावित्र्य राखणारे
बाबुळ झाड
उभेच आहे, उभेच राहील!!
-धनंजयबापू सोनार
लोकहितवादी पत्रकार
7972881440
अमळनेर

0 Comments