पोलीस खात्यातील दुय्यम अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मांडली लोकहितवादीकडे व्यथा.
बेवारस प्रेत असेल तर किमान 3 दिवस जतन करावे लागते, अमळनेर तालुक्यात शवागृह नाही, शीतपेटीची व्यवस्था नाही , प्रेत दवाखान्यात पोचविणे, जतन करणे पासून व दफन करणे हा खर्च कर्तव्यावर असलेल्या कर्मचारीच्या माथी पडतो.
तसेच वैद्यकीय अधिकारीं असो की पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी या पोलीस कर्मचारी वर्गास त्यांचे दबावात राहावे लागते,. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
पोलिसातील लेखी काम करणारे कनिष्ठ कर्मचारी, फिर्याद लिहिणारे वा अनेक संबंधित लोकांना आवश्यक स्टेशनरी मिळत नाही, ती त्यांना पदरमोड करून घ्यावी लागते, किंवा नाईलाजाने आरोपी/फिर्यदीस सांगून 'सोय' करावी लागते...वर्षभराचे स्टेशनरी बिल मात्र वरिष्ठ अधिकारी लाटतात असा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक या कडे लक्ष देऊन न्याय करतील का? असा सवाल आहेच!
आवश्यक स्टेशनरी देणे ही शासकीय जबाबदारी असून ती स्वतः उपलब्ध करा असे सांगून त्याचे बिल वरिष्ठ अधिकारी काढत असतील तर ही चोरी आहे! तसेच दफन करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना का भुर्दंड? याचाही विचार केला पाहिजे. प्रेत उचलणे, दवाखान्यात आणणे, त्याची हिल्हेवाट लावणे यात खूप खर्च होतो.
ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या कर्मचारीला वर खर्चाचे पैसे देखील पोलिसालाच द्यावे लागतात, हा अजब प्रकार आहे. असा प्रकार राज्यभर सर्वत्र असल्याची पुष्टी देखील त्यांनी केली.
आज एक निवृत्त अधिकारी यांचे समक्ष काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आपली ही व्यथा मांडली.
हे खरे असेल तर तो अन्याय आहे! वरिष्ठ अधिकारी या बद्दल दखल घेतील असा विश्वास आहेच!
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments