अमळनेर विधानसभा निवडणुक तीन बड्या नेत्यांच्या जय पराजयाचे विश्लेषण!

मंत्री दादांचा विजय व दोघांचा बड्या नेत्यांचा पराभव! 
जात- पैसा, छुपी रणनीती, बेसावधपणा, अति आत्मविश्वास  व अन्य समीकरणे!! 
अमळनेर विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा विजय समीक्षा करावा असाच आहे,. 
अनिलदादा यांचे बद्दल प्रचंड नाराजी असताना त्यांनी तीस हजारावर मतांची आघाडी घेतली. हे धक्कादायक असल्याने आजही एका वर्गात हळहळ तर दुसऱ्या वर्गात आनंद व्यक्त होत आहे. 
याला प्रमुख कारण म्हणजे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे उशिरा झालेले आगमन. म्हणजे ते निवडणूकींपूर्वी जेमतेम 6 महिन्यापूर्वी सक्रिय झाले.
त्यात सुतगीरणी हा प्रमुख मुद्दा लोकांनी लक्षात ठेवला. व अनिल पाटील यांनी तो सतत फोकस केला, त्यात शहादा साखर कारखान्याचे वृत्त तडका देणारे ठरले. 
शिरिषदादा यांची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा व लोकांना रसद देखील पोचली पण वरील मुद्दे प्रभावी ठरले असतानाच महाविकास आघाडीतील अनेकांची नाराजी देखील कॅश करण्यात शिरिषदादादा यांना अपयश आले किंवा त्यांनी त्यांना सिरीयस घेतले नाही. मात्र अनिलदादा यांनी मात्र ती संधी सोडली नाही. विविध पॅकेज व आश्वासन (प्रलोभन?) देऊन त्यांनी 'त्या सर्वांची मोट बांधली!
गत म्हणजे पहिली संधी मिळाली तेंव्हा नवखे असून देखील त्या निवडणूकित दुसऱ्या क्रमांकावर राहणारे डॉ अनिल शिंदे यांनी तिकिटाची स्पर्धा जिंकली तेंव्हाच दलित मुस्लिम व महाविकास आघाडीची पारंपरिक मते मिळून ते विजयी झाले आहेत असा कयास होता. पण, उशिरा मिळवलेले तिकीट हाती येण्या आधी अनिल भाईदास पाटील व शिरिषदादा चौधरी यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. 
त्यातही डॉ शिंदे यांनी प्रचंड पायपीट करून बरोबरी साधली. 
पण त्यांचे सोबत महाविकास आघाडीचे सर्वच नेते व कार्यकर्ते अपवाद वगळता  मनापासून होते का? या बाबत साशंकता आहेच,
अखेर आपण पिछाडीवर आहात याची खात्री पटवून देण्यात टीम अनिलदादा यांना यश आले आणी शेवटच्या काही दिवसात अंतर्गत तडजोड होऊन 'आपलाच' येऊ द्या असा संदेश विशिष्ट समाजास गेला.. त्या मुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले असाही मत प्रवाह आहे. 
अनिलदादा यांना मंत्री असल्याचा फायदा मिळाला तसा जातीचा देखील मिळाला हे सत्य कुणी नाकारणार नाही. त्यात भाजपाच्या मतांचा बोनस त्यांना प्राप्त झाला. 
डॉ शिंदे यांच्या बद्दल साशंकता निर्माण करण्यात टीम अनिलदादा यांना यश मिळाले म्हणून अल्पसंख्याक मतांची बिदागी देखील अनिल पाटील यांना मिळाली. त्या साठी त्यांनी पदरमोड देखील केल्याचे लपून राहिले नाही. 
विशेष म्हणजे पत्रकार व एकूणच प्रसिद्धी यंत्रणेवर अनिलदादा यांचे टीमने मोठा खर्च केला, कुणासही नाराज केले नाही पण शिरिषदादा यांचे कडून पत्रकार बांधवांना मात्र समाधानकारक काही मिळाले नाही. त्या मुळे तिथेही ते कमी पडले व अनिल पाटील प्लस होत गेले. 
पत्रकार बांधवांना खेळवत ठेवल्याचा कसा फटका पडतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सोबतच सदैव अडचणीत धावून जाणारे  शिरिषदादा चौधरी यांना अति आत्मविश्वास नडला.. मागील निवडणूकित निसटता पराभव झालाय म्हणून सहानुभूती वाढली, आणि अनिल पाटील यांचे बद्दल प्रचंड नाराजी होती त्या मुळे आपला सहज विजय होईल या भ्रमात नियोजन चुकले, तसेच महाविकास आघाडीचे तिकीट न मिळाल्याने नाराज लोकांना  आपल्याकडे वळविण्यात चौधरी बंधूंना अपयश आले. हे सत्य देखील नाकारता येणार नाही. 
एका अर्थाने उशिरा आलेले अनिल शिंदे यांच्या कमजोर कडीचा फायदा घेत अनिलदादा यांनी अति आत्मविश्वासात  बेसावध असलेल्या शिरीषदादा यांना पराभूत केले. असे म्हणायला हरकत नाही. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments