अनिलदादा दुसऱ्यांदा मंत्रिपदाच्या उंबरठ्यावर!

दादांच्या विजयाची कारण मीमांसा!
अमळनेर निवडणूक विश्लेषण भाग-५
●जुन्या जाणत्यांचे मार्गदर्शन●
मंत्री अनिल पाटील यांनी 2019 च्या विजयापासूनच गावागावातील जुने जाणते सर्वपक्षीय पुढारी नेते कार्यकर्ते यांच्याशी सतत संपर्क ठेवत मार्गदर्शन घेतले, गाव भेटी सुरू ठेवल्या, कुणाला दुखावले नाही याचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळाला. 
 ●सक्रिय कार्यकर्त्यांची उत्तम फळी●
उत्साही व सक्रिय अशा युवा कार्यकर्त्यांची उत्तम फळी अनिलंदादा व सहकाऱ्यानी बांधून ठेवली, त्याचा मोठा  फायदा त्यांना या निवडणुकीत झाला. तरुणाईने अहोरात्र घेतलेली मेहनत फळास आली. 
पत्रकारांशी नियमित संपर्क
19च्या विजया पासूनच तालुक्यातील सर्व पत्रकारांशी अनिलदादा यांनी अत्यन्त सलोख्याचे संबंध ठेवले, प्रसिद्धीवर मोठा भर दिला, पत्रकारांचे अडचणीत लक्ष घातले, जाहिराती व अन्य रूपाने मोठी मदत सुरूच ठेवली, त्याची जाण ठेवून पत्रकारांनी देखील मोठा हातभार लावला,  प्रसिद्धी विभाग सतत कार्यरत ठेवल्याचा काय व कसा फायदा होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
●आर्थिक तडजोड केली नाही●
अनिलंदादा यांनी प्रसिद्धी असो की राजकारणात कराव्या लागणाऱ्या अनेक क्लुप्त्या वा उपक्रमात आर्थिक कंजूशी केली नाही. मोकळ्या हाताने व नियमित केलेला खर्च देखील जमेची बाजू ठरला.
●भाजपचा बोनस●
शिंदे सेनेची फार ताकद नसताना भाजपची एकगठ्ठा मते हा जणू बोनसच ठरला. उद्धव ठाकरे यांचे धोरण हिंदू हिताचे राहिले नाही हे बिंबवन्यात यशस्वी झालेल्या भाजपच्या नेतृत्वाने अनिल पाटील यांचा विजय एकतर्फी करून टाकला. 
●कृषिभूषण दादांची मदत●
कधी डॉ अनिल शिंदे यांचे सोबत तर कधी शिरिषदादा यांचे स्वागत करीत तळ्यात मळ्यात करणाऱ्या माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आपली मदत शेवटी अनिलंदादा यांच्या पारड्यात टाकली, त्या कारणाने देखील अनिल पाटील यांचे मताधिक्य वाढले हे सत्य नाकारून चालणार नाही.
●विकासकामांचा धडाका● 
विशेष म्हणजे मंत्री झाल्या पासून मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात यश आले, त्या मुळे कोटयावधी रुपयांच्या विकास कामांचा आरंभ झाला. गावोगावी भूमिपूजन, कार्य प्रारंभ, उद्घाटन, लोकार्पण असा धडाका लावल्याने लोकांनी भरभरून मते दिली. 
●मंत्रिपदाचा फायदा●
मंत्रिपदापासून दूर असलेल्या अमळनेर मतदार संघाला पहिल्या वेळेस तेही थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले या जनतेच्या मनात असल्या अपेक्षा पूर्तीचाही फायदा अनिलंदादा यांना मिळाला.
●लाडक्या बहिणींचा आशीर्वाद● 
लाडकी बहीण योजना आली आणि ती बंद पडेल हा विरोधकांचा कांगावा हाणून पाडत महिलांच्या खात्यात पैसे येत गेले. यामुळे बहिणी खुश झाल्या व त्यांचा आशिर्वाद अनिलदादा यांना नक्की मिळाला. 
एकूणच या सर्व गोष्टी कल्पकतेने हाताळणारे पदाधिकारी, सहकारी व जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन या कारणे हा मोठा विजय झाला असून 
अनिल भाईदास पाटील हे दुसऱ्या वेळेस मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर उभे आहेत, हे नक्की. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments