आमदार अनिल पाटील यांची घोड्यावर वरात !

अमळनेरच्या धार गावात जंगी सत्कार!
अमळनेर विधानसभा मतदासंघात सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल तालुक्यातील धार येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा नवनिर्वाचित भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांचा धारवासीयांतर्फे जंगी सत्कार करण्यात आला.      
       सुरवातीला आमदार पाटील यांची घोड्यावरून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी धारचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै.एच एस पाटील यांच्या स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले.यानंतर भवानी मंदिराच्या परिसरात त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले.यावेळी आमदार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमास सुरेश पाटील, भागवत पाटील, शिवाजी पाटील, सोनू पाटील  गणेश धोंडू पाटील, यशवंत धोंडू पाटील, यशवंत शंकर पाटील, संजय पाटील, संजय शेनपडू पाटील, मगन बाबुराव पाटील, शशिकांत सखाराम पाटील, बुदागीर गोसावी,बाबू पेंटर, प्रा. गणेश पवार, उमाकांत साळुंखे, यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल पाटील यांनी व आभार प्रदर्शन अलीम मुजावर यांनी केले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments