गतवर्षी अमळनेर येथिल प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले या संमेलनात साहित्यिक मुलाखत हा विषय प्रताप महाविद्यालयाने जाहीर केला होता, त्यात अनेक संघातील प्रथम विजेते प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र पदविधर निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांना सात हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
वैष्णवी पाटील, प्राची पाटील द्वितीय तर तेजस्विनी कोठावदे, दिशा महाजन यांना तृतीय क्रमांक मिळाला.
निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांनी प्रसिध्द साहित्यिक डॉ रविंद्र शोभणे, कवि अशोक कोतवाल, राजेंद्र कांबळे, डॉ रंजन गर्गे, देविदास फुलारी यांच्या प्रकट मुलाखती घेतल्या होत्या.
उत्तम संभाषण कला, निवडक प्रश्न व सादरीकरण ह्या कारणे या मुलाखती परीक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ते प्रथम विजेते ठरले होते. त्यांना प्रतापच्या स्नेह संमेलतात गौरविण्यात आले.
प्रथम विजेते निर्भय धनंजय सोनार व गौरव पाटील यांना डॉ नितीन पाटील, प्रा योगेश पाटील, ऍड. सारांश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
डॉ विजय तुंटे, डॉ संदीप नेरकर, प्रा तोरवणे, प्रा अवीत पाटील, प्रा.ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. विलास गावित, हेमंत पवार, डॉ शशिकांत सोनवणे, आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सांघिक विजेते निर्भय सोनार व गौरव पाटील यांचे डॉ डिगंबर महाले, सतीश देशमुख, संदीपराजे घोरपडे, डॉ. जी.एम. पाटील, डॉ प्रशांत शिंदे, डॉ. अनिल शिंदे, डॉ अविनाश जोशी, प्रा. लीलाधर पाटील, ऍड एस.आर.पाटील, दिलीप सोनवणे, निबंधक इंद्रवदन सोनवणे, सुवर्णकार समाज व अमळनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवानी अभिनंदन केले.
-लोकहितवादी परिवार
7972881440


0 Comments