रुग्णास भेटायला जाताना पुढील काळजी घ्या!

आपण किती शहाणे आहोत ही अक्कल पाजळू नका!!
■शक्य झाले तर साधे सरळ कपडे घालून बडेजाव न मिरवता नॉर्मल भेटा! 
■स्वच्छ साफ सुधरे जा, पादत्राणे बाहेर काढा, पेशन्ट ला स्पर्श करू नका! 
■खूप दुःख वाटत असेल तरी त्याचे वा त्याचे नातेवाईक यांचे समोर रडू नका. 
■अकारण भीती घालू नका
■हा डॉक्टर बोगस आहे, मी सांगेल त्या डॉक्टर कडे जा असे सांगून रुग्ण व परिवाराची मानसिकता खराब करू नका
■मी किती हुशार अशी अक्कल शिकवू नका 
■मी कशी ओळख करून कमी पैशात काम करून घेतले असे सांगू नका, त्यामुळे रुग्ण व नातलग डिप्रेशनमध्ये येतात. 
■भेटायला गेला तर फळं नेले तर उत्तम पण पण फुल घेऊन आरोग्य चांगले राहावे म्हणून शुभेच्छा द्या! 
■जास्त वेळ घेऊ नका, इकडच्या तिकडच्या पेशन्ट च्या गप्पा ऐकवू नका! 
■डॉ सल्ला देतील त्या पेक्षा आपण किती शहाणे आहोत असे दाखवुन फुकट आहार विहाराचे सल्ले देऊन आपली नसलेली अक्कल पाजळू नका. 
■माझ्या वेळी याने बिस्किट चा पुडा आणला नहोता पण मी त्याचे नाक कापण्यासाठी नारळ घेऊन आलोय हे दाखवायची गरज नाही. 
■आणलेच नारळ वा फळं तर किती महाग भेटली हे सांगून मी किती खर्च केला हे बोलून दाखवू नका.  
■अकारण एक्क्स-रे, अन्य रिपोर्ट पाहून आपल्याला 'फार समजते' असा अविर्भाव आणून चुकीचे मत मांडू नका!
■जर देणारच नसाल तर अकारण 'काही लागले तर अर्ध्या रात्री फोन करा मी रेडी आहे' हे सांगून ठेवू नका कारण ती व्यक्ती त्याचे इतर प्रयत्न सोडुन तुमच्यावर अवलंबून राहील व तुम्ही आयत्या वेळी फसगत कराल. असे व्हायला नको.
■शक्य झाले दवाखान्यात भेटायला जाऊच नका. गेलात  तर कमी बोला, कमी वेळ घ्या! डॉक्टर माझा मित्र आहे, तो आपल्याला टरकतो वगैरे सांगून पेशन्टचा फालतू गैरसमज वाढवू नका, कारण गरज पडली की तुम्ही फोन घेणार नाहीत.
थोडक्यात कोणत्याही रुग्णास भेटायला जाताता आपली नसलेली (असली तरी!) अक्कल घरीच ठेवून जावे! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments