अमळनेर येथील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सव म्हणजे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
धनदाई संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी .डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य के.डी पाटील हे उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सचिव राधेश्याम पाटील, संचालक नंदकुमार पाटील, शैलेंद्र पाटील, संचालिका प्रा.डॉ.सौ नयना पाटील, प्रा. सौ निशा पाटील, बागुल सर , धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .लिलाधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताने झाली. यावेळी जय योगेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीं ध्वजगीत व स्वागत गीत म्हटले.
संविधान अमृत महोत्सव साजरा करताना शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे, गीत गायन, नाटिका, नृत्य असे विविध सांस्कृतिकपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य के.डी पाटील यांनी आपले संविधान हा देशाचा प्राण आहे, प्रत्येक पिढीसाठी, माणसाच्या उन्नतीचे व प्रगतीचे साधन बनले आहे. हे संविधान वाचविणे व संविधानाचे रक्षण करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे आवाहन केले.
याप्रसंगी जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शांतिनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय चित्रकला महाविद्यालय व आयटीआय कॉलेजचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शैलेंद्र पाटील व सौ. माधुरी प्रशांत पाटील मॅडम यांनी केले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments