ओमकार नगर समस्यांच्या विळख्यात! नप प्रशासन लक्ष देईल का?

अमळनेर येथील ओमकार नगर समस्यांच्या विळख्यात! नप प्रशासन लक्ष देईल का? 
गटारी, स्वच्छता, पथदिवे, उद्यानाकडे गंभीर दुर्लक्ष! 
जगप्रसिद्ध मंगळ मंदिरा कडे धरणगाव रस्त्याकडून जाणारा रस्ता निकृष्ट झाला आहे, मध्य रस्त्यात इलेक्ट्रिक पोल  अपघातास निमंत्रण देत उभा आहे. शेकडो मंगळ भक्त या मार्गाने प्रवेशतात त्यामुळे चोपडा रस्त्यावरील रहदारी कमी होण्यास मदत होते. परंतु या रस्त्यावर पाणी साचते, 
परिसरात असलेली प्रशस्त बाग नगर परिषदेस वर्ग करण्यात आली परंतु येथे कोणत्याही सुविधा स्वच्छता नाही, या उद्यानात दिवे, बाक, चेकर्स बसवावेत, काटेरी झुडुपे तोडून स्वच्छता आवश्यक आहे, 
परिसरातील तुंबलेल्या गटारी मुळे रोगराई वाढत आहे.
नगर परिषदेने तातडीने उपाययोजना करावी म्हणून राहिवाश्यानी मुख्याधिकारीना वेळोवेळी निवेदन दिले आहे. 
तातडीने उपाययोजना न झालेस येथील रहिवासी कोणताही कर भरणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 
मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments